7th Pay Commission DA Hike: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असल्यास, तुम्हाला महागाई भत्त्याशी संबंधित अपडेट माहित असणे आवश्यक आहे.
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर, 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 48 लाख निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबद्दल आनंदाची बातमी मिळेल.
1 जानेवारीपासून डीए लागू करण्याचा निर्णय सरकारने 27 मार्च रोजी घेतला होता. 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के वाढीव भत्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे.
जुलैचा डीए लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Employees) एक मोठी अपडेट आली आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही आनंद होईल.
मार्च महिन्याची AICPI निर्देशांकाची आकडेवारी कामगार मंत्रालयाने 28 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली आहे.
फेब्रुवारीमध्ये घट झाल्यानंतर मार्चमध्ये हा आकडा पुन्हा वाढला आहे. यापूर्वी, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यात घट नोंदवण्यात आली होती. आकडेवारीत मोठी वाढ पाहायला मिळाल्यास, डीएमध्येही अपेक्षेप्रमाणे 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
डिसेंबर 2022 पर्यंत AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे मार्च 2023 मध्ये जानेवारीचा महागाई भत्ता जाहीर करण्यात आला.
परंतु जानेवारी ते जून 2023 या कालावधीतील आकडेवारीचा आधार म्हणून जुलैचा महागाई भत्ता जाहीर केला जाईल. जानेवारीमध्ये हा आकडा 132.8 अंकांपर्यंत वाढला होता.
यानंतर, फेब्रुवारीमध्ये त्यात घसरण झाली आणि तो 132.7 अंकांवर पोहोचला. मार्चमध्ये तो पुन्हा वाढला आणि तो 133.3 अंकांवर पोहोचला.
फेब्रुवारीमध्ये 132.7 च्या आकड्यानुसार, महागाई भत्ता 44 टक्क्यांच्या जवळ पोहोचला होता. यावेळी तो 44 टक्क्यांच्या पुढे वाढला आहे.
सध्या महागाई भत्ता 42 टक्के आहे. एआयसीपीआय इंडेक्स डेटाच्या आधारे जुलैचा महागाई भत्ता जूनपर्यंत जाहीर केला जाईल. यावेळी ते 42 टक्क्यांवरुन 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नवीन महागाई भत्ता सप्टेंबरमध्ये जाहीर केला जाऊ शकतो, परंतु तो 1 जुलैपासून लागू केला जाईल.
जानेवारीचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आता यात आणखी 4 टक्के वाढ झाली तर 46 टक्के होईल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (DA Hike) वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी 2023 चा DA जाहीर झाला आहे. आता जुलै 2023 चा डीए सरकारकडून (Government) जाहीर व्हायचा आहे.
AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरवले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.