5G Internet In India: आजपासून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात

5G Spectrum Auction: 5G दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावामध्ये एअरटेल, अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या लिलावासाठी शर्यतीत आहेत.
5G Spectrum Auction
5G Spectrum AuctionDainik Gomantak
Published on
Updated on

देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आजपासून सुरू होत आहे. या लिलावात देशातील अनेक मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या सहभागी होणार आहेत. देशात 5-जी सुरू झाल्यास इंटरनेट सेवेचा वेग वाढणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. 5G मुळे इंटरनेट स्पीड मेगाबाइटवरून (Megabyte) गीगाबाइटवर (Gigabyte) पोहचेल. यामध्ये 4G च्या तुलनेत 100 पट अधिक इंटरनेट स्पीड मिळेल. 5G टेक्नोलॉजीचा वापर केवळ स्मार्टफोनसाठीच मर्यादित राहणार नसुन तर घरातील स्मार्ट इलेक्ट्रीकल उपकरण देखील तुम्हाला 5G ला कनेक्ट करता येणार आहे. (5G Internet In India News)

5G दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावात एअरटेल (Airtel), अदानी डेटा, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या कंपन्या या लिलावासाठी शर्यतीत आहेत. अंबानी आणि अदानी हे दोन उद्योगपती सहभागी होणार असल्याने या लिलावाची उत्सुकता आणखीच वाढली आहे. अदानी ग्रुप आता 5G स्पेक्ट्रम लिलावात सायबर सुरक्षा, विमानतळ(AirPort) , बंदरे, लॉजिस्टिक, वीज निर्मिती, प्रसारण, वितरण आणि विविध उत्पादन ऑपरेशन्समध्ये खाजगी नेटवर्क सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी सहभागी होणार असल्याची माहिती अदानी ग्रुपकडून देण्यात आली आहे.

मुकेश अंबानींचे रिलायन्स जियो देखील 5G च्या पार्श्वभुमिवर तयारीला लागलं आहे. भारतात 5G सर्विस सुरु झाल्यास भारत जगातील 35 be देश असेल जिथे 5G चा वापर करण्यात येईल. 5G उत्सुकता संपूर्ण भारतीयांना लागली आहे. तरी 2023 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारतात 5G सर्विस सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

5G Spectrum Auction
Kargil Vijay Diwas: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केला शूरवीरांना सलाम, ट्विट करत म्हणाल्या..

जगातील दुसरे सर्वात मोठे वायरलेस मार्केट (Wireless Market) भारतात (India) आहे. जगभरातील विविध देशात 5G नेटवर्क उपलब्ध आहेत. भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क (Network) सुरू होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतात 5G सर्विसबाबत चर्चा सुरू आहे. भारतीय यूजर्स 5G सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आजपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com