बिर्याणीची भारतीयांवर जादू! दर सेकंदाला मारला दोन फुल एक हाफ बिर्याणींवर ताव

Biryani-Swiggy: विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी भारतीयांनी ४३०,००० बिर्याणी मागवल्या होत्या.
2023 was the eighth consecutive year in which biryani topped the food ordered by Indians.
2023 was the eighth consecutive year in which biryani topped the food ordered by Indians.Dainik Gomantak
Published on
Updated on

2023 was the eighth consecutive year in which biryani topped the food ordered by Indians:

भारतीय लोकांमध्ये चविष्ट जेवणाची आवड झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2023 हे सलग आठवे वर्ष होते ज्यामध्ये भारतीयांनी ऑर्डर केलेल्या फडूमध्ये बिर्याणीने पहिला क्रमांक पटकावला.

2023 मध्ये भारतीय दर सेकंदाला 2.5 बिर्याणी ऑर्डर केल्या असे अहवालात म्हटले आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की कोणत्या बिर्याणीची सर्वात जास्त ऑर्डर देण्यात आली होती, तर या बाबतीत चिकन बिर्याणीने सर्वांचे रेकॉर्ड तोडले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, प्रत्येक 5.5 चिकन बिर्याणीमागे 1 व्हेज बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती.

विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२३ रोजी भारतीयांनी ४३०,००० बिर्याणी मागवल्या होत्या.

Swiggy द्वारे ““How India Swiggy’d 2023- unwrapping India’s year in on-demand convenience” या नावाने एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल 1 जानेवारी ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंतचा डेटा आहे आणि यामध्ये स्विगीने आपल्या संपूर्ण वर्षाच्या ऑर्डर्सचा डेटा दिला आहे.

या अहवालातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे देशातील सुमारे 24.9 लाख लोकांनी स्विगीवर येताच सर्वप्रथम बिर्याणी ऑर्डर केली. बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर हैदराबादमधून आल्या होत्या. बिर्याणीच्या संपूर्ण विक्रीचा समावेश केला तर प्रत्येक सहावी ऑर्डर हैदराबादहून आली आहे.

2023 was the eighth consecutive year in which biryani topped the food ordered by Indians.
निराशाजनक चित्र! देशातील 95 टक्के जनता Insurance Policy विना, फक्त 5 टक्के लोकांकडे भविष्याची तरतूद

19 नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारतीयांकडून दर मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली होती.

अहवालात असेही नमूद केले आहे की चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधील यूजर्सकडून सर्वाधिक ऑर्डर्स आल्या होत्या. त्यापैकी प्रत्येकाने 10,000 पेक्षा जास्त ऑर्डर दिल्या होत्या. किमतीचा विचार केला तर सर्वाधिक खर्च मुंबईतील एका युजरने केला आहे. या यूजरने 42.3 लाख रुपयांचे जेवण ऑर्डर केले होते.

2023 was the eighth consecutive year in which biryani topped the food ordered by Indians.
Flashback 2023: फोल्डेबल फोन्ससाठी हे वर्ष ठरले खास, 'या' फोन्सनी वेधले सर्वांचे लक्ष

रसगुल्ला विरुद्ध गुलाब जामुन

दुर्गापूजेच्या वेळी, गुलाब जामुनने रसगुल्ल्याला मात दिली. गुलाब जामुनसाठी ७७ लाखांहून अधिक ऑर्डर देण्यात आल्या होत्या. नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांच्या शाकाहारी ऑर्डरमध्ये मसाला डोसा हा सर्वात जास्त पसंतीचा पदार्थ होता.

केक ठरली बेंगळुरूची पहिली पसंती

बेंगळुरू ही देशाची 'केक कॅपिटल' ठरली, जिथे केवळ चॉकलेट केकसाठी 85 लाख ऑर्डर देण्यात आल्या होत्या.

मदर्स डे (१४ मे) रोजी सर्वाधिक चॉकलेट केक मागवण्यात आले. नागपुरातील एका युजरने एका दिवसात 92 केक ऑर्डर केले होते.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्विगीवर दर मिनिटाला 271 केकची ऑर्डर देण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com