विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात 'इंट्रेस्ट',20 दिवसांतच 19,712 कोटींची गुंतवणूक

डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 18 नोव्हेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटी मार्केटमध्ये 14,051 कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर कर्ज विभागात 5,661 कोटी रुपये ठेवले आहेत
19,712 cr rupees  FPI in stock market till 20th November
19,712 cr rupees FPI in stock market till 20th November Dainik Gomantak
Published on
Updated on

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत (Indian Market) आतापर्यंत 19,712 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 18 नोव्हेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटी मार्केटमध्ये (Stock Market) 14,051 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यादरम्यान त्यांनी कर्ज विभागात 5,661 कोटी रुपये ठेवले. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 19,712 कोटी रुपये झाल आहे. (19,712 cr rupees FPI in stock market till 20th November)

या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून 949 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, 1-12 नोव्हेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी, त्यांनी या कालावधीत रोखे बाजारात 3,745 कोटी रुपये ठेवले. अशा प्रकारे त्यांची निव्वळ काढणी 949 कोटी रुपये झाली. ऑक्टोबरमध्ये FPIs ची निव्वळ विक्री रु. 12,437 कोटी होती.

तर दुसरीकडे मागील तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत देशांतर्गत समभागांमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs) हिस्सा 13 टक्क्यांनी वाढून 667 अब्ज झाला आहे. एका वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की देशांतर्गत शेअर बाजारांच्या मजबूत कामगिरीमुळे या तिमाहीत स्टॉकमधील एफपीआयचा हिस्सा वाढला आहे.

19,712 cr rupees  FPI in stock market till 20th November
म्युच्युअल फंडांमध्ये SIP गुंतवणूकदारांची वाढली संख्या

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात FPIs बँकिंग आणि अगदी माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या क्षेत्रात विक्रेते झाले आहेत. ते म्हणाले की बहुतेक परदेशी मध्यस्थ वाढीव मूल्यांकनाच्या चिंतेमुळे भारतात विक्रीसाठी उत्सुक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com