
India 17 Crore New Jobs: देशात गेल्या सहा वर्षात बेरोजगारीच्या दरात तब्बल 50 टक्क्यांची घट झाली. होय, चकीत झालात ना... भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या सहा वर्षांत (2017-18 ते 2023-24) सुमारे 17 कोटींहून अधिक नवीन रोजगार निर्माण झाले. या काळात देशातील एकूण रोजगार 47.5 कोटींवरुन 64.33 कोटींवर पोहोचला. विविध क्षेत्रात एकूण 16.83 कोटी नवीन रोजगार निर्माण झाले.
याच कालावधीत देशातील बेरोजगारी दरात (Unemployment Rate) जवळपास 50 टक्क्यांची मोठी घट झाली. 2017-18 मध्ये 6 टक्के असलेला बेरोजगारी दर 2023-24 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला. विशेष म्हणजे, महिलांच्या कार्यशक्तीतील सहभागातही (Women in Workforce) लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
रोजगाराशी संबंधित प्रमुख संकेतके (Employment Indicators) सातत्याने सुधारत आहेत. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (LFPR) आणि वर्कर-पॉप्युलेशन रेश्यो (WPR) या दोन्हीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांत वाढ झाली आहे.
LFPR मध्ये वाढ: 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटासाठी LFPR 49.8 टक्क्यांवरुन 60.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
WPR मध्ये वाढ: WPR याच काळात 46.8 टक्क्यांवरुन 58.2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, म्हणजे अधिकाधिक लोक आता कार्यशक्तीत सामील होत आहेत.
मासिक डेटा: मासिक आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये LFPR 55 टक्क्यांवर, तर WPR 52.2 टक्क्यांवर पोहोचला आहे.
रोजगार वाढीत महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
महिला LFPR: महिलांचा LFPR 2017-18 मधील 23.3 टक्क्यांवरुन 2023-24 मध्ये 41.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
महिला WPR: महिला WPR देखील याच काळात 22 टक्क्यांवरुन 40.3 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
EPFO मध्ये नोंदणी: 2024-25 या आर्थिक वर्षात 26.9 लाख महिला कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सामील झाल्या.
भारतातील बेरोजगारी दर सातत्याने कमी होत आहे. 2017-18 मध्ये 6 टक्के असलेला हा दर 2023-24 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे. याच काळात, तरुणांमधील बेरोजगारी दर 17.8 टक्क्यांवरुन 10.2 टक्क्यांवर आला आहे, जी 7 टक्क्यांची घट आहे. जागतिक स्तरावर (ILO) हा दर 13.3 टक्के आहे.
शहरांतील बेरोजगारी: शहरांमध्ये पुरुष बेरोजगारी (Unemployment) दर जुलै 2025 मध्ये 6.6 टक्क्यांवरुन ऑगस्टमध्ये 5.9 टक्क्यांवर आला आहे.
ग्रामीण बेरोजगारी: एकूण ग्रामीण बेरोजगारी मे मध्ये 5.1 टक्क्यांवरुन ऑगस्ट 2025 मध्ये 4.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
या 6 वर्षांत रोजगाराचे स्वरुप बदलत आहे.
स्वयंरोजगारात वाढ: स्वयंरोजगार 52.2 टक्क्यांवरुन 58.4 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेचा ट्रेंड दर्शवतो.
वेतनवाढ: प्रासंगिक मजुरांची सरासरी दैनिक मजुरी 294 रुपयांवरुन 433 रुपये झाली आहे. तर नियमित वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी मासिक कमाई 16,538 रुपयांवरुन 21,103 रुपये झाली आहे.
औपचारिकरण: सप्टेंबर 2017 पासून 7.73 कोटींहून अधिक लोक ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत, जे रोजगाराच्या औपचारिकरणात वाढ दर्शवते.
स्टार्टअप्स, गिग इकॉनॉमी (Gig Economy) आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) भारतीय रोजगार बाजाराचे भविष्य घडवत आहेत. सध्या भारत जगात तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. त्यांनी 17 लाखांहून अधिक रोजगार निर्माण केले आहेत.
केंद्र सरकारने महिलांसाठी (Womens) नमो ड्रोन दीदी, लखपती दीदी, मिशन शक्ती आणि कृषी सखी अशा योजना सुरु केल्या आहेत. तसेच, विज्ञान आणि संशोधनासारख्या क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी 'WISE-KIRAN' आणि 'SERB-POWER' सारखे कार्यक्रम राबवले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.