Goa Theft Dainik Gomantak
Video

Goa Theft: केपे येथील सोन्याच्या दुकानातील चोरीप्रकरणी एका महिलेला पुण्यातून अटक, दोघांचा शोध सुरू

Quepem: ‘भवानी गोल्ड शॉप’मधून गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ३.७८ लाख रुपयांचे सोने पळवून नेले होते. या प्रकरणी केपे पोलिसांनी एका महिलेला पुणे येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: येथील ‘भवानी गोल्ड शॉप’मधून गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ३.७८ लाख रुपयांचे सोने पळवून नेले होते. या प्रकरणी केपे पोलिसांनी जया सचिन बडगुजर या महिलेला पुणे येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी केपे बाजारातील ‘भवानी गोल्ड शॉप’मध्ये तीन महिलांनी सोने खरेदी करण्याचे बहाणे करून काही सोन्याच्या वस्तू दाखवायला लावल्या होत्या व यावेळी शिताफीने काही सोन्याच्या वस्तू घेऊन ही महिला पसार झाली होती. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये महिलांनी या वस्तू चोरून नेल्याचे स्पष्टपणे दिसत होते व याचाच आधार घेऊन केपे पोलिसांनी तापसकामाला सुरवात केली होती.

या चोरीप्रकरणातील संशयित पुणे येथे असल्याचा सुगावा लागताच दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली केपे पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे, पोलिस कॉन्स्टेबल अमिर नाईक, प्रणय नाईक, महिला पोलिस वेना दातेकर व दीक्षा झोरे यांनी पुणे येथून जया सचिन बडगुजर या महिलेला अटक केली असून आणखी दोघा महिलांचा केपे पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT