Subahsh Velingkar Dainik Gomantak
Video

'मराठीच्या राजभाषेसाठी समर्थन देणार नाही, त्या नेता किंवा पक्षाला मतदान करणार नाही', अशी भूमिका घ्या; वेलिंगकरांचे आवाहन Video

Goa Marathi Language Issue: आगामी निवडणुकीत केवळ मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणाऱ्या पक्षाला वा नेत्यालाच मतदान करावे, अन्यथा मतदान करू नये

Pramod Yadav

केपे: जो नेता मराठी राजभाषा होण्यासाठी समर्थन देत नाही, त्या नेत्याला किंवा पक्षाला आम्ही मतदान करणार नाही, असा निर्धार आम्ही केला पाहिजे, अशी कडक भूमिका मराठी राजभाषा आंदोलनाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी आज जाहीर केली. केपे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील कार्यक्रमात ते बोलत होते.

म्हापसा येथे १० हजार लोकांची उपस्थिती असलेल्या भरगच्च संमेलनात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमोर मनोहर पर्रीकर यांनी, सत्तेवर आल्यास मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देतो, असे खुलेआम आश्वासन दिले होते.

मात्र, ते आणि त्यांच्यानंतरच्या नेत्यांनीही या आश्वासनाला हरताळ फासला, अशी खंत वेलिंगकर यांनी व्यक्त केली. मराठी भाषेचे स्थान कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा वर असायला हवे.

आपण वर्षानुवर्षे ठरावीक पक्षाला मतदान करीत आला असला, तरी आगामी निवडणुकीत केवळ मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणाऱ्या पक्षाला वा नेत्यालाच मतदान करावे, अन्यथा मतदान करू नये. यापेक्षा वेगळे कोणतेही शस्त्र तुमच्याकडे नाही, असे वेलिंगकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Vaibhav Sooryavanshi: 50 चेंडूंचे चॅलेंज 25 चेंडूंतच संपवले! वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ, ठोकलं शानदार शतक Watch Video

Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

SCROLL FOR NEXT