Subhash Velingkar  Dainik Gomantak
Video

Subhash Velingkar: फ्रान्‍सिस झेवियरच्या कृपेने गोव्यात 250 वर्षे जगातील 'अत्यंत क्रूर' न्यायालय होते : वेलिंगकर

St. Francis Xavier DNA controversy: सैतान किंवार राक्षसही अशा प्रकारचे वर्तन कधी करणार नाही, असे दिसते. असे वर्तन तत्‍कालीन पाद्रींनी धर्म चौकशीच्या नावाखाली आमच्या पूर्वजांशी केले, असा आरोप हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यानी आज कुंडईतील तपोभूमीवरील कार्यक्रमात केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Subhas Velingkar First Statement After St Francis Xavier DNA Test Controversy

पणजी: गोव्यावर पोर्तुगिजांचे आक्रमण झाले. पोर्तुगिजांनी हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीच्या उच्चाटनाचा प्रयत्न केला. फ्रान्‍सिस झेवियरच्या कृपेने गोवा धर्म चौकशी (गोवा इन्क्विझिशन) न्यायालय मिळाले. जगातील अत्यंत क्रूर असे हे न्यायालय २५० वर्षे येथे होते. त्यात आमचे पूर्वज केवळ भरडले गेले नाहीत तर त्यांना यमयातना दिल्या गेल्या. यातनांचे वर्णन जर जाणून घेतले तर सैतान किंवार राक्षसही अशा प्रकारचे वर्तन कधी करणार नाही, असे दिसते. असे वर्तन तत्‍कालीन पाद्रींनी धर्म चौकशीच्या नावाखाली आमच्या पूर्वजांशी केले, असा आरोप हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यानी आज कुंडईतील तपोभूमीवरील कार्यक्रमात केला. त्यांच्या वक्तव्याने प्रभावित होऊन ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्‍गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या गळ्यातील हार वेलिंगकर यांना भेट दिला. गायीला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी गो प्रतिष्ठा आंदोलनाच्या नावाने यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा देशभरात ३५ ठिकाणी जाणार आहे. अयोध्या या रामजन्मभूमीतून सुरू झालेल्या यात्रेचा समारोप कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे होणार आहे. यात्रा ज्या राज्यात जाते तेथे गोध्वज लावण्यात येतो. यावेळी मंचावर श्री द्वारकापीठाधीश्वर जगद्‍गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज, तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, श्री गोपाळमणी महाराज यावेळी मंचावर होते. यावेळी गो रक्षणासाठी वावरणाऱ्यांना ५६ जणांना सन्मानित करण्यात आले. यात रावणफोंड येथील बेकायदा कत्तलखाना उघडकीस आणणाऱ्यांचाही समावेश होता.

बदल गरजेचा!

आमची जुनी ओळख पुनर्प्रस्थापित करण्यात आजवरचे सारे राज्यकर्ते असमर्थ ठरले. धर्म व संस्कृतीविरोधी गोष्टींना आजही मान्यता मिळते. एका वाटेने गोमातेची पूजा केली जाते, तर दुसऱ्या बाजूने ख्रिस्ती बांधवांना गोमांस कमी पडू दिले जाणार नाही, असे जाहीर केले जाते. एका वाटेने गो संवर्धन, गो रक्षण तर दुसऱ्या बाजूने गो हत्या. यात बदल होण्याची गरज आहे, असे वेलिंगकर म्हणाले.

ती दहशत अजूनही लोकांच्या मनात कायम!

गोव्याच्या नावातच गोवंशाची महती आहे. गोवापुरी, गोपकपट्टम, गोमांचल, गोमंतक या नावांनी अनादी काळापासून या प्रदेशाला ओळखले जाते. पाचशे वर्षांत पोर्तुगिजांनी गोव्याची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला.

तेव्हाची दहशत आजही सर्वांच्या मनात कायम आहे. मुक्तीनंतर अनेक पक्षांची सरकारे आली. त्यांच्या कारकिर्दीत पोर्तुगिजांनी घडवून आणलेला अनिष्ट बदल मूळ पदावर आणला गेला नाही, असे वेलिंगकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT