Heavy Rain In Sattari Dainik Gomantak
Video

Heavy Rain In Sattari: सत्तरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर, अनेक ठिकाणी झाडांची पडझड

Sattari: सत्तरी तालुक्यात सोमवारी दुपारपासून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विविध भागात झाडे कोसळून वीजवाहिन्या आणि काही घरांचे मोठे नुकसान झाले.

Sameer Amunekar

वाळपई: सत्तरी तालुक्यात सोमवारी दुपारपासून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विविध भागात झाडे कोसळून वीजवाहिन्या आणि काही घरांचे मोठे नुकसान झाले. धावे, सातोडे, होंडा, नानेली, रेडीघाट आदी परिसरात या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अधूनमधून पावसाचा जोर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे वाहत असल्याने दर दिवशी झाडांची पडझड सुरू असून नुकसान होत आहे.

धावे-सत्तरी येथे धावे-उस्ते रस्त्यावर जंगली झाड कोसळून वाहतूक काही काळ बंद झाली होती. सातोडे येथे फणसाचे झाड थेट वीजवाहिनीवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सुंदरम हॉल, होंडा येथे झाडाझुडपांमध्ये गुरे अडकली होती, ती वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढली. नानेली-सत्तरी येथे काजूचे झाड वीजवाहिनीवर तसेच घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले. रेडीघाट येथील श्री गणेश मंदिराजवळ जंगली झाड पडण्याची घटना घडली.

वाळपई अग्निशमनची तत्परता

वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. जवानांनी झाडे तोडून रस्त्यावरून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. या मदतकार्यात अग्निशमन दलाचे कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT