Shri Mallikarjun Devasthan Canacona Dainik Gomantak
Video

Canacona: श्री मल्लिकार्जुन देवाचे समुद्रस्नान! श्रीस्थळ येथील पालखी उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

Shri Mallikarjun Devasthan Canacona: पहाटे ५ वाजता मंदिराकडून श्रींच्या नूतन उत्सवमूर्तीचे पालखीतून पारंपरिक वाद्यघोषासह समुद्रस्नानासाठी प्रयाण झाले.

Sameer Panditrao

आगोंद: काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधीश्वर महापती देवस्थानचा पालखी उत्सव आणि समुद्रस्नान सोहळा आज सकाळी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन समुद्राला केळी अर्पण केली.

आज (ता. २७) पहाटे ५ वाजता मंदिराकडून श्रींच्या नूतन उत्सवमूर्तीचे पालखीतून पारंपरिक वाद्यघोषासह समुद्रस्नानासाठी प्रयाण झाले. यावेळी पारंपरिक ठिकाणी तोरणांची सजावट केली होती. वाटेत एकूण ९ ठिकाणी पारंपरिक ठिकाणी बैठका झाल्या.

यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी ७.३० च्या सुमारास राजबाग, तारीर येथील देवावेळ समुद्र किनाऱ्यावर श्रींचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. श्रींचे समुद्रस्नान मंत्रघोषात झाल्यावर समुद्राला केळी अर्पण करून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. समुद्रस्नान करून ब्राह्मणाला दान देण्याची प्रथा यावेळी पाळण्यात आली. श्रींचे समुद्र स्नान आटोपल्यावर सकाळी ९ वाजता श्रींचा लवाजम्यासह मुख्य देवस्थानात परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी ११.३० च्या दरम्यान पालखी मिरवणूक मुख्य देवस्थानात पोचली. या ठिकाणी पूजा-अर्चा झाल्यावर प्रसाद वितरण झाले.

शिमगोत्सव साहित्याची कोटींची उलाढाल

यावेळी समुद्र किनाऱ्यावर झालेल्या जत्रेमध्ये आगामी काळात होणाऱ्या शिमगोत्सवाच्या साहित्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. विविध प्रकारच्या दुकानांनी किनारा गजबजला होता. अनेक भागांतून लोक येथे आले होते. यावेळी मुंडासे, तोणये, गोफ, पाट, इत्यादी शिमगोत्सवाचे साहित्य, तसेच खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने उभारली होती. हे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT