Goa Nightclub Fire Dainik Gomantak
Video

हडफडेतील 'ती' दुर्घटना नव्हे हत्याच! डॉ. ऑस्कर आज परप्रांतीय गेले, उद्या गोमंतकीयांवर बेतेल - डॉ. ऑस्कर रिबेलो

Goa Nightclub Fire: उद्या ही परिस्थिती आम्हा गोमंतकीयांवरदेखील बेतू शकते, अशी खंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी व्यक्त केली.

Sameer Amunekar

पणजी: आज गोवा स्थानिकांच्या हातातून सुटत आहे. दिल्ली लॉबीने गोव्याचे राजकारणच नव्हे तर अर्थकारणावर ताबा मिळवला आहे. न्यायालय, कायदा यांना न जुमानता सर्रास अवैधपणे क्लब चालविले जात आहेत. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबमध्ये जे आगीने बळी घेतले ती दुर्घटना नसून हत्याच आहे, असे सडेतोड मत समाजकार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी मांडले.

जर सामान्य व्यक्तीकडून लहानशी चूक झाली तर त्यावर तत्काळ कारवाई होते; परंतु हडफडेत अवैध पद्धतीने क्लब चालत होता, स्थानिकांचा विरोध होता तरीदेखील प्रशासन मूग गिळून, डोळे झाकून शांत बसले होते. काल परप्रांतीयांचा, पर्यटकांचा बळी गेला. उद्या ही परिस्थिती आम्हा गोमंतकीयांवरदेखील बेतू शकते, अशी खंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी व्यक्त केली. ते ‘गोमन्तक टिव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, डॉ. रिबेलो म्हणाले की, आज काही मोजके लोक गोव्याचे भवितव्य ठरवत आहेत आणि लोक त्यांना वारंवार निवडूनही देत आहेत. गोव्याची जमीन, पर्यटन, अर्थकारण कोण बिघडवत आहे याची कल्पना आहे; परंतु आम्ही राजकीय बदल घडविल्याशिवाय काहीच बदलणार नाही. आज जनतेला कळून चुकले आहे की, विद्यमान सरकारने कितीही चांगली आश्‍वासने दिली तरी ती पूर्ण होणार नाहीत. कुणावरही कठोर कारवाई होणार नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलने करणे लोकांनी सोडून दिले आहे. लोकांनी सरकारकडून अपेक्षा ठेवणेच बंद केले आहे.

अजूनही आपण संकोचित विचारात गुरफटत आहोत; परंतु गोव्यातील २० टक्के तरुणाई आज ड्रग्सच्या जाळ्यात अडकत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, खासगी इस्पितळात पर्यटन हंगामात किती ड्रग्सचे रुग्ण येतात ते पाहा. आमच्या गोव्याला संपवले जातेय, अशी खंतही डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारने योगींकडून शिकावे!

आज मिठागराच्या जागेत क्लब उभारले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असतानादेखील कोणतीच कारवाई होत नाही, याला नेमके म्हणावे तरी काय? किमान कायदे तरी पाळले जाणार आहेत की नाहीत? गोव्यातील सरकारने बाकी काही नसले तरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून कशाप्रकारे बुलडोझर चालवत अवैध बांधकामे जमीनदोस्त करावीत हे शिकावे. गोव्याला जर योग्य पर्यटन हवे असेल तर ही भूमिका घ्यावीच लागेल, अन्यथा जो काही गोवा म्हणून आज आम्ही पाहतो तोदेखील दिसणार नसल्याचे डॉ. रिबेलो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

Horoscope: करिअरमध्ये प्रगतीचे योग! 'या' राशींना मिळेल मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

SCROLL FOR NEXT