Datta Damodar Naik  Dainik Gomantak
Video

Datta Naik: दत्ता नायकांचा ‘लुटारू’ शब्द खटकला, तक्रारदार भट यांचे मत; त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा लोलयेकरांचा आरोप

Sadetod Nayak About Datta Naik Case: संपादक-संचालक राजू नायक यांनी दत्ता नायक यांनी केलेली टीका आणि त्‍या अनुषंगाने निर्माण झालेल्‍या वादासंदर्भात सतीश भट व मोहनदास लोलयेकर यांच्‍याशी संवाद साधला.

Sameer Panditrao

पणजी: ‘साहित्यिक तथा विचारवंत दत्ता नायक यांच्याशी माझा काही वैयक्‍तिक वाद नाही किंवा त्यांनी माफी मागावी, अशीही माझी इच्छा नाही. परंतु, ज्यावेळी आपण दुसऱ्याविषयी एखादा शब्द वापरतो तेव्हा तो जपून वापरावा. पर्तगाळ मठ आणि भटजीसंबंधी ‘लुटारू’ हा शब्द वापरला, तो मला खटकला. त्यांनी भविष्यात शब्द वापरताना विचार करावा’, असे मत दत्ता नायक यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करणारे सतीश भट यांनी व्यक्त केले. तर देवाची ढाल करून समित्या लुटतात, असा प्रतिवाद मोहनदास लोलयेकर यांनी केला.

गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात द्वयींनी मते मांडली. संपादक-संचालक राजू नायक यांनी दत्ता नायक यांनी केलेली टीका आणि त्‍या अनुषंगाने निर्माण झालेल्‍या वादासंदर्भात सतीश भट व मोहनदास लोलयेकर यांच्‍याशी संवाद साधला. एका प्रश्‍‍नावर भट म्हणाले, पर्तगाळ मठ आपल्या प्रसिद्धीचा कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता लोकविश्‍वास प्रतिष्ठान तसेच इतर शाळांसाठी मोठ्या प्रमाणात काम करतो. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे हे चुकीचे ठरतात.

देवळांत, मठांमध्ये आजही जातपात मानली जाते!

देव मूर्त स्वरूपात असतो; परंतु देवाची ढाल करून समित्या लुटतात; देवळांत, मठांमध्ये आजही जातपात मानली जाते, हे चुकीचे नाही का? आणि असे विचारले की काहींच्‍या भावना दुखतात. देवाची ढाल पुढे करून तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. देव व देऊळ यातील हा पुसट फरक समजून घ्यायला लागेल. त्‍या विरोधात भाष्य करणाऱ्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

ती श्रद्धेने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता!

समाजात काही बाजू वाईट असतात; तशाच चांगल्याही असतात. त्यामुळे जे चांगले आहे, ते समोर आणणे गरजेचे आहे. जे वाईट आहे तेच उगाळून काही होणार नाही. समाज पुढे जाण्यासाठी चांगल्या गोष्टींना चालना देणे गरजेचे आहे. गोव्यातील अनेक देवस्थाने ही स्वायत्तपणे कार्यरत आहेत. त्यांचा समाजाप्रति कार्य करण्याचा विचार निश्‍चितच स्वागतार्ह आहे; परंतु मंदिरांमध्ये किंवा मठामध्ये जी देणगी दिली जाते, ती लूट नसून ती श्रद्धेने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता आहे, असे सतीश भट यांनी सांगितले.

...म्‍हणून नायकांना वेठीस धरले जाते!

‘जर एखाद्या व्यक्तीने मत मांडले, नवा विचार मांडला तर त्याविषयी वादविवाद करण्याची परंपरा या देशात आहे; परंतु त्याला आपला विचार न मांडू देता एकावर एक अशा वेगवेगळ्या पोलिस स्थानकात तक्रारी नोंदवत जाणे आणि त्या व्यक्तीस जेरीस आणणे ही सनातनी परंपरा अनेकजण चालवत आहेत. अशा परंपरेचा विरोध संत ज्ञानेश्‍वर, संत तुकारामांनी केला. तो काहींना आजही मान्य नसल्यानेच दत्ता नायकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोप मोहनदास लोलयेकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT