Sadetod Nayak Dainik Gomantak
Video

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Carlos Ferreira: वेळ मारून नेण्यासाठी सत्ताधारी आमदार एकत्रितपणे उभे राहून आरडा-ओरडा करतात आणि विधानसभेत धुडगूस घालत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आमदार कार्लुस आल्वारिस फेरेरा यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: विधानसभा अधिवेशनात विरोधक म्हणून आम्ही आमची कामगिरी चोख बजावत आहोत. जनतेचे विविध प्रश्‍न मांडत आहोत, परंतु आमच्या मुद्यांचे खंडण करणे सत्ताधाऱ्यांना कठीण बनत आहे. त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी सत्ताधारी आमदार एकत्रितपणे उभे राहून आरडा-ओरडा करतात आणि विधानसभेत धुडगूस घालत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आमदार कार्लुस आल्वारिस फेरेरा यांनी सांगितले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान फेरेरा म्हणाले, सरकारने सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्यासाठी भू -महसूल कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे, परंतु यामुळे २०१४ पूर्वी गोव्यात येऊन ज्या बिगर गोमंतकीयांनी घरे उभारली आहेत, त्यांचे देखील त्या जागेवरील घर कायदेशीर होईल. त्यामुळे अशा या नियमांचा मोजक्याच गोमंतकीयांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आर्थिक नियोजनच बिघडले’

सद्यःस्थितीत सरकारचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे याबाबत काहीच बोलले जात नाही. ज्या गोष्टी सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत त्या मागेच रहात आहेत. आता कदंब महामंडळातील अनेक बस या चालवण्यायोग्य राहिलेल्या नाहीत, परंतु नव्या बस आणण्यासाठी पैसे नाहीत. योग्य नियोजन नाही. सरकारने जर मनात आणले तर गोव्यातून कोळसा वाहतूक बंद करणे शक्य आहे, परंतु सरकारची तशी मानसिकता नसल्याचे दिसून येत असल्याबाबत फेरेरा यांनी खंत व्यक्त केली.

अनेकदा सरकारला ‘घरचा अहेर’

ज्यावेळी मंजुरीसाठी आणलेल्या विधेयकाचे समर्थन करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार उभे राहतात, त्यावेळी ते अनेकदा सरकारचा विरोध करत ‘घरचा अहेर’ देत असल्याचे दिसून येत आहे. कदाचित कॉंग्रेस पक्षातून भाजपात गेलेल्या आमदारांना अजून ‘अच्छे दिन’ आलेले नसावेत. सरकार पक्षातील आमदारांपेक्षा विधानसभा अधिवेशनाचा अधिक काळ विरोधकांना मिळायला हवा, असे फेरेरा यांनी सांगितले.

‘काब्रालांशी माझे मैत्रिबंध’

माझी मैत्री केवळ विशिष्ट पक्षातील नेत्यांशीच आहे असे नाही. मी आमदार आता झालोय, परंतु अनेकांशी माझी पक्षापलीकडे जाऊन पूर्वीपासून मैत्री आहे. ज्यावेळी मी वकील म्हणून दुसऱ्या वकिलाशी प्रतिवाद करतो, त्यावेळी मी त्याचा दुश्‍मन नसतो. मी व्यक्ती कोणत्या पदावर आहे हे पाहून कधी मैत्री केलेली नाही, त्यापलीकडे व्यक्ती म्हणून नातेसंबंध जपले आहेत. नीलेश काब्रालांशी माझी अनेक वर्षांची मैत्री असल्याचे फेरेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT