Ravindra Bhavan Margao News Dainik Gomantak
Video

Ravindra Bhavan: 'नुकसान भरपाई द्या'! संतप्त तियात्र कलाकारांची मागणी; रवींद्र भवनात विशेष बैठक, Video

Ravindra Bhavan Margao: रवींद्र भवन मडगाव दुरुस्तीसाठी अनिश्र्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने तियात्र कलाकारांना मोठा फटका बसला आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: रवींद्र भवन मडगाव दुरुस्तीसाठी अनिश्र्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने तियात्र कलाकारांना मोठा फटका बसला आहे. यंदाच्या पावसाळ्यात नवीन तियात्रांसाठी त्यांनी तयारी केली होती व त्यासाठी भरपूर खर्चही केला होता. आज तियात्रिस्त आणि रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीनंतर तियात्रिस्तांनी सभागृहाची पाहणी केली. या बैठकीत त्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

रवींद्र भवनला नुकसान भरपाई देण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यासाठी गोवा तियात्र अकादमीशी संपर्क साधावा. यावेळी अकादमीचे अध्यक्ष ॲंन्थनी बार्बोझा उपस्थित होते. बार्बोझा यांनी नुकसान भरपाईची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.

तियात्रिस्तांच्या आणखी काही मागण्या असतील तर त्या जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा केली, असे तालक यांनी सांगितले. आपण व मडगावचे आमदार दिगंबर कामत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याची विनंती करणार आहोत, असेही तालक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल; स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अरुंधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

भारताला टार्गेट करुन अमेरिकेची मोठी कारवाई! 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत 200 हून अधिक फार्मसी वेबसाइट्स बंद; काय नेमकं प्रकरण?

Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

SCROLL FOR NEXT