Marigold cultivation in Goa Dainik Gomantak
Video

Marigold Goa: 'उठ रे, चल रे, झेप घे कर निश्चय भिड जा रे'! पावसाच्या आव्हानांवर मात करत गोव्यातील शेतकऱ्याने फुलवला झेंडू; Video

Ravi Naik Virnoda farmer: अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे. भातशेतीचे नुकसान झालेच, शिवाय झेंडू फुलांच्या मळ्यांनाही फटका बसला आहे.

Sameer Panditrao

मोरजी: अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे. भातशेतीचे नुकसान झालेच, शिवाय झेंडू फुलांच्या मळ्यांनाही फटका बसला आहे. तरीही, चिवई-विर्नोडा येथील शेतकरी रवी नाईक व त्यांची पत्नी श्रेया नाईक यांनी या आव्हानांवर मात करत फुलांचा मळा फुलवला आहे.

याबाबत बोलताना रवी नाईक म्‍हणाले की, दिवाळी, तुळशीविवाह आणि इतर सणासुदीच्या काळात बाहेरून येणाऱ्या झेंडू फुलांच्या विक्रीवर निर्बंध आणले पाहिजेत, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांनी फुलवलेल्या झेंडू फुलांना बाजारात योग्य मागणी मिळेल. झेंडूच्या फुलांची लागवड ही केवळ शेती नाही, ती संस्कृतीचा भाग आहे. सरकारने स्थानिक उत्पादकांचे हित लक्षात घ्यावे.

नाईक दाम्पत्याने यंदा तीन हजारांहून अधिक झेंडूची रोपे लावली आहेत. ‘आत्मा’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी झाडांची निगा राखली आहे. मात्र पावसामुळे फुले फुलण्याचा काळ उशिरा सुरू झाल्याने दसऱ्याला झेंडूची फुले कमी पडली. आता मात्र तुळशीविवाहासाठी त्यांच्या शेतात फुले उमलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT