Panaji smart city Dainik Gomantak
Video

Panjim News: पणजीतील स्ट्रीट लाईट्स रात्री गुल; "स्मार्ट सिटी फक्त नावापुरतीच?" नागरिकांचा सवाल

Street lights in Panjim: सरकार केवळ विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च करतंय असा आरोप स्थानिकांनी केलाय

Akshata Chhatre

पणजी: राजधानी पणजीत वेगवेगळ्या भागांमधून लोकं कामासाठी तसेच शिक्षणासाठी येत असतात आणि या लोकांची काही गैरसोय होऊ नये ,म्हणून शहरात जागोजागी स्ट्रीटलाईट्स असणं महत्वाचं आहे. येणाऱ्या लोकांना सुरक्षित वाटावं, फिरताना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या लाईट्स महत्वाच्या आहेत, मात्र सध्या पणजी शहरातील या लाईट्स रात्रीच्यावेळी बंद तर दिवसभर मात्र सुरूच दिसतायत. यामुळे सरकार केवळ विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च करतंय असा आरोप स्थानिकांनी केलाय.

स्मार्टसिटीच्या नावाखाली सरकार फक्त लाख आणि कोटी रुपये खर्च करतंय. शहरात आज जागोजागी स्ट्रीटलाईट्स आहेत मात्र त्या कधीच रात्रीच्यावेळी पेटत नाहीत असा आरोप स्थानिकांनी व्यक्त केलाय. सरकारला याबद्दल काहीही पडून गेलेलं नाही, मंत्र्यांनी एकदा शहरात फेरफटका मारून बघावं, एसीच्या गाडीत बसून काहीही समजत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मिरामार,दोना पावला अशा ठिकाणी लहान मुलं, महिला फिरतात त्यांची ये-जा सुरु असते, पण जर का लाईस्ट नसतील तर त्यांचीच सुरक्षा कशी व्हायची अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या अंधारात बाहेर निघणं देखील मुश्किल झालं असल्याचं एक स्थानिक महिला म्हणाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT