Shigmotsav Goa 2025 Dainik Gomantak
Video

Panjim Shigmotsav: पणजीत शिगमोत्सवाची धूम

Shigmotsav Goa 2025: गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला पणजी शिगमोत्सव यंदा पर्यटकांसाठी अभूतपूर्व अनुभव ठरला.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला पणजी शिगमोत्सव यंदा पर्यटकांसाठी अभूतपूर्व अनुभव ठरला. रंगीबेरंगी रोषणाई, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात काढलेले रोमटामेळ, कल्पकतेची उंची गाठणारे चित्ररथ आणि उत्साही कलाकारांच्या वेशभूषेने सारा आसमंत भारावला होता. हा उत्साह एवढा उंचावला की, शिगमोत्सव पहाटे सहावाजेपर्यंत रंगला.

शहरातील प्रमुख मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. जुने सचिवालय ते कांपाल मार्गावर काढलेल्या मिरवणुकीसाठी स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. चित्ररथ, लोकनृत्य, रोमटामेळ पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड उत्साह दिसत होता. मध्यरात्रीनंतरही लोकांची अफाट गर्दी पाहून वातावरण जणू दुपारसारखं भासत होतं.

शहरात एवढी गर्दी उसळली की, मध्यरात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटकांनी मात्र याचा फारसा त्रास न मानता, रस्त्यावरच नाचत, फोटो काढत शिमगोत्सवाचा आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT