Pahalgam Attack Protest Goa Dainik Gomantak
Video

Pahalgam Protest Siolim: दहशतवाद्यांचे बॅनर जाळले, पाकिस्तानविरोधी घोषणा; पहलगाम हल्ल्याचा राय-शिवोलीत निषेध

Pahalgam Attack Protest Goa: हल्ला अत्यंत भ्याड, निर्दयी तसेच मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा हल्ल्यास सरकारकडून कठोरपणे उत्तर देणे आवश्यक असल्याचे शिवोलीतील समर्थन संघटनेचे नितीन आगरवाडेकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

कळंगुट: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड, निर्दयी तसेच मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा हल्ल्यास सरकारकडून कठोरपणे उत्तर देणे आवश्यक असल्याचे शिवोलीतील समर्थन संघटनेचे उपाध्यक्ष नितीन आगरवाडेकर यांनी सांगितले. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील स्वामी समर्थ मठ तसेच समर्थन संघटनेतर्फे आयोजित निषेध सभेत आगरवाडेकर बोलत होते. यावेळी समर्थनचे सचिव यदुवीर सीमेपुरुषकर, कांचन पेडणेकर, रितेश वारखंडकर, मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुलवामानंतर काश्मीरच्या पहलगाम येथे झालेला हल्ला हा पूर्व नियोजीत होता. यावेळी केवळ हिंदू धर्मियांनाच दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे. त्यामुळे दहशतीला धर्म असतो ही गोष्ट सिद्ध होत असल्याचे समर्थन संघटनेचे सचिव यदुवीर सीमेपुरुषकर यांनी सांगितले. या निषेध सभेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी समर्थन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानचा निषेध करणाऱ्या घोषणा देत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची चित्रे असलेला बॅनर जाळण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT