Rohan Khaunte Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2025: ओल्ड गोवा येथे मॉल उभारणार, ही अफवाच; मंत्री खंवटे

Rohan Khaunte: लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, या प्रकल्पासंबंधी चुकीची माहिती पसरवली जात आहे. येथे कोणताही मॉल उभारला जाणार नाही.

Sameer Panditrao

पणजी: जुने गोवे येथे पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सुविधा केंद्राच्या कामाला चर्च आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) परवानगी मिळाल्याशिवाय सुरुवात केली जाणार नाही, असे स्पष्ट मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

विधानसभेत आमदार वीरेश बोरकर आणि राजेश फळदेसाई यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, या प्रकल्पासंबंधी चुकीची माहिती पसरवली जात आहे. येथे कोणताही मॉल उभारला जाणार नाही. याबाबत अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत.

‘प्रसाद’ योजना २०१४-१५ मध्ये केंद्र सरकारने सुरू केली होती. ती धार्मिक स्थळांचे सर्वंकष विकास साधण्यासाठी राबवली जाते. जुने गोवे प्रकल्पासंदर्भात २०१९ मध्ये उच्चस्तरीय समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या समितीत एएसआय, नागरनियोजन विभाग आणि जुने गोवे पंचायतचे प्रतिनिधी होते. दरम्यान, आजवर चर्चसोबत देखील सात बैठक झाल्या असून मी एका बैठकीला उपस्थित होतो, असे मंत्र्यांनी सभागृहात सांगतले.

मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, ‘एएसआय’ने २ मार्च २०२२ रोजी प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याची पाहणी केली होती. त्यानंतर सुधारित आराखडा ६ जानेवारी २०२३ रोजी सादर करण्यात आला. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने १२ मे २०२३ रोजी प्रकल्पास मान्यता दिली. यानंतर ७ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT