Sattari urmila gaokar home Dainik Gomantak
Video

Sattari: ..पाठीवरती हात ठेऊन फक्त लढा म्हणा! पावसात कोसळले छत - भिंत; सत्तरीच्या महिलेला मिळणार नवे घरकुल

Sattari urmila gaokar: नालेली, सत्तरी येथील गरीब महिला उर्मिला लुसो गावकर यांना पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वखर्चाने नवीन घरकुल बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Sameer Panditrao

वाळपई: नालेली, सत्तरी येथील गरीब महिला उर्मिला लुसो गावकर यांना पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वखर्चाने नवीन घरकुल बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसांत बांधकामाला सुरवात होणार आहे.

उर्मिला यांच्या घराची एक बाजूची भिंत सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. भरपावसात घरात पाणी शिरल्याने छत जमिनीवर कोसळले. तसेच इतर भिंतीही अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत.

कोणत्याही क्षणी संपूर्ण घरच कोसळण्याची शक्यता आहे. उर्मिला या अत्यंत गरीब असून त्या रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पती, मुलगी आणि दिरासह त्या राहतात. घरात कोणी कमावणारे नसल्याने ती मिळेल ते काम करून कुटुंब चालवते.

या घटनेचे वृत्त गोमन्तकमध्ये प्रसिद्ध होताच आमदार राणे यांनी तत्काळ दखल घेत मंगळवारी सकाळी आपले पथक गावकर यांच्या घरी पाठवले असता हे घर पूर्णतः मातीचे व मोडकळीस आलेले असल्याने दुरुस्त करणे शक्य नसल्याचे दिसून आले.

सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घराची एक बाजूची भिंत कोसळली. सुदैवाने त्या वेळी घरातील सदस्य दुसऱ्या खोलीत होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरात पाणी शिरल्याने. छतही जमिनीवर कोसळले.

नव्या घरामुळे आनंदीत...

उर्मिला गावकर म्हणाल्या की, मी कधीच आमदाराकडे गेले नाही की कधी मदतीची मागणी केली नाही. मात्र आमदाराने स्वतःहून लक्ष दिले. त्यांनी आपली विचारपूस केली व नवीन घर बांधून दिले जाईल असे सांगितले. घराच्या बांधकामास दोन दिवसांत सुरवात होणार आहे, याचा आपल्याला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांत कामाला सुरवात : राणे

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले की, पर्ये मतदारसंघातील जनतेच्या अडचणी म्हणजे माझी जबाबदारी आहे. नानेलीतील उर्मिला गावकर यांच्या घराची भिंत पावसात कोसळली. या पावसात ती कुठे जाणार, त्यामुळे तातडीने नवे घर बांधून देणार. येत्या दोन दिवसांत कामाला सुरवात होईल. सत्तरीतील प्रत्येक माणूस आमचा आहे. यावेळी पंच तनया गावकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT