Murder Case Dainik Gomantak
Video

Murder Case: चिकन मटणाचा बेत करुन दारु ढोसली; क्षुल्लक कारणावरून मेव्हण्यानेच भावोजीला संपवले

Goa Murder Case:दोघांत जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला त्यात डेव्हिड याने आपला भावोजी दीपकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.

Pramod Yadav

फोंडा: माणूस मद्याच्या नादी लागला की काय होईल आणि काय नाही, याचा भरवसा नाही. मदिरेच्या आहारी जाऊन कित्येक दुर्घटना घडल्या आहेत. असाच एक दुर्दैवी प्रकार कोडार-बेतोडा येथे घडला आहे. रात्री मद्यपान आणि चिकन मटणाचा बेत केला. मस्तपैकी जेवण बनवले, त्यापूर्वी दारूही ढोसली आणि क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याने शेवटी मेव्हण्यानेच भावोजीचा खून केला.

ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. कोडार बेतोडा येथील श्रीकांत उमयें कुटुंबीयांच्या बागायतीची देखभाल व राखणदारी करण्यासाठी मूळ झारखंड येथील मेहुणा आणि भावोजीला कामावर ठेवण्यात आले होते.

झाडांना पाणी सोडणे तसेच इतर कामाबरोबरच बागायतीची आणि गुरांची देखभाल करणे आदी कामासाठी मूळ झारखंड येथील डेव्हीड शिलास टोपो (वय ४०) व दीपक बोल्तास तिर्की (वय २७) या मेहुणा व भावोजीला बागायत मालकाने कामावर ठेवले होते.

चिकन भाताची थाळी तशीच...

रात्री या दोघांनी चिकन मटणाचा बेत केला होता. त्यापूर्वी दोघांनी यथेच्छ दारू ढोसली; पण दोघांत जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला त्यात डेव्हिड याने आपला भावोजी दीपकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यावेळी जेवण वाढलेले ताट तसेच पडून होते

मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात

1) आपल्या घरात दोघांचे जोरदार भांडण होत असल्याची माहिती बागायतीचे मालक श्रीकांत उमयें यांना मिळाल्यावर त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता दीपक तिर्के रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला

2) संशयित खुनी डेव्हिड टोपो पळण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

3) दीपक तिर्के याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात पाठवण्यात आला असून फोंडा पोलिस स्थानकाचा ताबा असलेले निरीक्षक राघोबा गावडे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Center: 'गोव्यात एआय केंद्र स्थापन करणार; 240 सरकारी सेवा थेट व्हॉट्सॲप चॅटबॉटवर मिळणार' मुख्यमंत्र्यांची माहिती

IND vs ENG: गिलसेनेचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा संघ झाला सुपर स्ट्रॉंग, जोफ्रानंतर आता 'या' धाकड गोलंदाजाचं संघात पुनरागमन

Goa Live News: मी बैठकीत नाही, पण जेवणासाठी सहभागी झालो : सभापती तवडकर...

Viral Video: 'त्यानं' माकडांनाही लावलं पळवून! डोकं हॅंग करणारा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

SCROLL FOR NEXT