Mayem Kayaking Service Dainik Gomantak
Video

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Goa Mayem Kayaking Service: जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या मये तलावावर ''कायाकींग'' बोटिंग सुविधा सुरू करण्यात आलीय.

Sameer Amunekar

समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात अन्य अनेक पर्यटनस्थळे असून, या पर्यटनस्थळांना नवसंजीवनी आणि पर्यटनाला चालना मिळण्याची गरज आहे. ‘गोवा बियोंड बीच’ संकल्पनेंतर्गत राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा भर आहे, असे प्रतिपादन खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले.

जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या मये तलावावर ''कायाकींग'' बोटिंग सुविधेच्या शुभारंभप्रसंगी खासदार तानावडे प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजीही तेवढीच महत्वाची आहे, असेही तानावडे म्हणाले. आमदार केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, कुंदा मांद्रेकर, कुलदीप आरोलकर, पुनम रिबो आदी उपस्थित होते.

खासदार, आमदार सहभागी!

सदानंद शेट तानावडे यांनी फीत कापून कायाकींग बोटिंग सेवेचा शुभारंभ केला. त्यांच्यासह प्रेमेंद्र शेट आणि केदार नाईक यांनी कायाकींग बोटिंगचा आनंद लुटला. पर्यटनखात्याच्या सहकार्याने पर्यटन महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. कोकण एक्स्पलोअर्सतर्फे ही ''कायाकींग बोटिंग'' सेवा सुरु केली आहे. यावेळी ग्रामस्थ, पर्यटक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT