Margao News Dainik Gomantak
Video

Margao News: बेकायदेशीर अतिक्रमणे हटवा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मडगाव नगरपालिकेला आदेश

Ake Powerhouse Encroachments: आके-पावरहाऊस येथील वीज खात्‍याच्‍या मालमत्तेवर अतिक्रमण करून उभारलेल्‍या गाड्यांसह या भागातील रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेली सर्व अतिक्रमणे या महिन्‍याभरात हटवा, अशा आशयाचा आदेश दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिट्‌स यांनी आज जारी केला.

Manish Jadhav

आतापर्यंत फक्‍त राजकीय आशीर्वादामुळे टिकून राहिलेल्या आके-पावरहाऊस येथील वीज खात्‍याच्‍या मालमत्तेवर अतिक्रमण करून उभारलेल्‍या गाड्यांसह या भागातील रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेली सर्व अतिक्रमणे या महिन्‍याभरात हटवा, अशा आशयाचा आदेश दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिट्‌स यांनी आज जारी केला. मडगाव पालिकेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटवून ३१ मेपर्यंत आपल्‍याला अहवाल सादर करावा, असा आदेश क्‍लिट्‌स यांनी जारी केला आहे.

यापूर्वी वीज खात्‍याच्‍या विभाग १८चे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्ये यांनी यासंदर्भात जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली हाेती. आके-पावरहाऊससमोर असलेले फुटपाथ या अतिक्रमणांनी व्‍यापल्‍याने वीज खात्‍याची वाहने हलविण्‍यास त्‍याचा अडथळा होतो, असे त्‍यांनी या तक्रारीत म्‍हटले होते.

याशिवाय शेट्ये यांनी वैयक्‍तिक स्‍तरावर मडगाव पालिकेला नाेटीस पाठवून पालिकेकडून उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाचा भंग होत असल्‍याचे नमूद केले होते. उच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी एका आदेशाअन्‍वये रस्‍त्‍याच्‍या बाजूला असलेली दुकाने हटविण्‍याचा आदेश दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

Sanjog Gupta: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! संजोग गुप्ता बनले नवे CEO; 2500 उमेदवारांमधून निवड

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

SCROLL FOR NEXT