Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
Video

Bodgeshwar Jatra: बोडगेश्वराच्या जत्रोत्सवास प्रारंभ, भाविकांना फेरीचे आकर्षण Video

Bodgeshwar Jatra 2025: जत्रोत्सव गुरुवार, ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या जत्रोत्सवाची आकर्षण असलेली मोठी फेरी सध्या लोकांचे लक्ष वेधत करत आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: भक्तांच्या हाकेला धावणारा राखणदार तसेच जागृत दैवत श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा ९१वा महान जत्रोत्सव शुक्रवारी (२ जानेवारी) हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला. हा जत्रोत्सव गुरुवार, ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या जत्रोत्सवाची आकर्षण असलेली मोठी फेरी सध्या लोकांचे लक्ष वेधत करत आहे.

जत्रोत्सवाच्या पूजेचे यजमानपद देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामन पंडित यांनी सपत्नीक भूषविले. दु. १२ वा. देवाच्या चरणी श्रीफळ ठेवून व पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी म्हापसा परिसरातील विविध देवस्थाने, विविध संस्था, पोलिस, अग्निशमन दल व पालिकेतर्फे श्रींच्या चरणी फळांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद झाला.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उपसभापती जोशुआ डिसोझा, जिल्हाधिकारी अंकित यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी वर्षा परब, पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक नवीन देसाई, संजीत कांदोळकर, मार्लन डिसोझा, मामलेदार अनंत मळीक यांच्यासह विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींंनी दुपारपर्यंत श्रींचे दर्शन घेतले. शिवाय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार जीत आरोलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, नगरसेवक, नगरसेविका यांनी देवदर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MGNREGA Renaming: गोवा सरकारचा मोठा निर्णय! मनरेगाचं बदललं नाव, आता ‘या’ नावानं ओळखली जाणार योजना; वर्षाला मिळणार 125 दिवस काम

पुण्यातून गोव्यात पर्यटनासाठी गेला, ओव्हरटेक करण्याचा मोह भोवला; उत्तरप्रदेशच्या तरुणाने अपघातात जीव गमावला

गोव्यात ‘आप’मधून गळती सुरुच, युवा आघाडीच्या नेत्यांचाही पक्षाला रामराम; ‘रिमोट कंट्रोल पॉलिटिक्स’वरुन काँग्रेसच्या केजरीवालांना कानपिचक्या

निकोलस मादुरोंच्या अटकेचे पडसाद! अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर मध्यरात्री हल्ला; वॉशिंग्टनमध्ये तणावाची स्थिती Watch Video

VIDEO: खांद्यावर हात ठेवला नंतर... अ‍ॅशेसमध्ये मोठा राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT