BMW Car Hits Activa Dainik Gomantak
Video

Goa Accident: म्हापशां बोडगेश्वर देवळालागसर कार आनी स्कूटरीमदी अपघात

Mapusa accident news: एका बीएमडब्ल्यू कारने ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला

Akshata Chhatre

म्हापसा-पणजी मार्गावर बोडगेश्वर मंदिरासमोर सोमवारी (दि.२९) रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. एका बीएमडब्ल्यू कारने ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बोडगेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन पणजीच्या दिशेने जात होता, तेव्हाच हा अपघात घडला. कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या दोन्ही पायांना अनेक फ्रॅक्चर झाले. त्याला तातडीने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये हलवण्यात आले आहे.

म्हापसा पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी सांगितले की, या जंक्शनवर पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी खूप अंधार असतो. त्यामुळे खराब दृश्यमानता हे अपघाताचे प्रमुख कारण असू शकते, असा आरोप त्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्यात मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT