Leopard in goa village Dainik Gomantak
Video

VIDEO: पोर्तावाडा-शिवोलीत बिबट्याचे दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Siolim Leopard: पोर्तावाडा -शिवोली येथे शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बार्रेटो यांच्या घराच्या कंपाऊंड परिसरात एका बिबट्याचे दर्शन झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: पोर्तावाडा -शिवोली येथे शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बार्रेटो यांच्या घराच्या कंपाऊंड परिसरात एका बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून सरपंच अमित मोरजकर तसेच माजी उपसरपंच विघ्नेश चोडणकर यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांसहित घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी स्थानिक तरुणी फियोना बार्रेटो या चर्चच्या प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी निघाल्या असता त्यांची नजर कंपाऊंडलगतच्या झुडुपात पहुडलेल्या त्या बिबट्यावर गेली. यावेळी, क्षणाचाही विलंब न लावता फियोना बार्रेटो यांनी आपल्या मोबाईलमधून त्याचे फोटो घेतले व ते सोशल मीडियात व्हायरल केले. दरम्यान, ही माहिती पसरताच सरपंच अमित मोरजकर तसेच विघ्नेश चोडणकर यांनी वन अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले व परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT