Korgao Farm Incident Dainik Gomantak
Video

Korgao: 'देव त्यांचे भले करो'! कोरगावातील नुकसानग्रस्त शेतकरी महिलेला अर्थसाह्य; मिशन फॉर लोकलचा पुढाकार

Korgao Farm Incident: सावित्री गावडे म्हणाल्या की , सुमारे आठ वर्षापूर्वी मी व माझ्या मुलीने मेहनत घेऊन या बागायतीत पोफळी व कवाथे लावले होते, मी अन् माझ्या मुलीने ही झाडे वाढवलेली होती.

Sameer Panditrao

पेडणे: गावडेवाडा कोरगाव येथे अज्ञात व्यक्तीनी रात्रीच्यावेळी सावित्री गावडे या विधवा व ज्येष्ठ महिलेच्या मालकीच्या बागायतीतील फोफळी व दोन माडाचे कवाथे कापून नुकसान केलेल्या बागायतीची पेडणे मिशन फार लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी पहाणी करून या महिलेचे सांत्वन केले व आर्थिक मदतही दिली.

‘मिशन फॉर लोकल’चे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी पेडण्याचे माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांच्यासोबत गावडेवाडा - कोरगाव येथे सावित्री गावडे यांच्या बागायतीतील फोफळी व कवाथे कापून नुकसानी केलेल्या बागायतीची पाहणी केली. १३ रोजी रात्री अज्ञातांनी सावित्री गावडे यांच्या मालकीची तीस फोफळीची झाडे व दोन कवाथे कापून टाकले होते.

सावित्री म्हणतात देव त्यांचं भले करो !

सावित्री गावडे म्हणाल्या की , सुमारे आठ वर्षापूर्वी मी व माझ्या मुलीने मेहनत घेऊन या बागायतीत पोफळी व कवाथे लावले होते, मी अन् माझ्या मुलीने ही झाडे वाढवलेली होती.

या बागायतीतील उत्पन्नावरच आमची उपजीविका चालते. आम्ही कुणाचेच वाईट केलेले नाही. तरीही पोफळी व कवाथे कुणी का कापून टाकले ?त्यांना आमचे नुकसन करून काय मिळाले. देव त्यांचे भले करो!.

यावेळी सावित्री गावडे आणि तिच्या मुलीने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल राजन कोरगावकर यांचे आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्री निधीतून मदत द्या!

या गरीब ज्येष्ठ महिलेच्या बागायतीची जी नुकसानी झाली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीतून साहाय्य करावे, अशी विनंती राजन कोरगावकर यांनी यावेळी करून पेडणे कृषी कार्यालयाने पाहणी करून या महिलेस पोफळी व माडाचे कवाथे लावण्यास द्यावेत, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT