Panjim Konkani Rashtra Manyata Divas Dainik Gomantak
Video

Panjim: पणजीत कोकणी राष्ट्र मान्यता दिवस उत्साहात साजरा

Panjim Konkani Rashtra Manyata Divas: कोकणीला राष्ट्र मान्यता मिळवून देण्यासाठी, तिला राजभाषा करण्यासाठी जे म्हालगडे वावरले त्याच्या मागील उद्देशच आज आम्ही हरवून बसलोय.

Sameer Amunekar

पणजी: कोकणीला राष्ट्र मान्यता मिळवून देण्यासाठी, तिला राजभाषा करण्यासाठी जे म्हालगडे वावरले त्याच्या मागील उद्देशच आज आम्ही हरवून बसलोय. ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर यांनी कोकणीचा वापर हा गोवा घडविण्याचे साधन म्हणून केला. गोवा राखण्यासाठी कोकणी अस्मिता व ओळख महत्त्वाचे साधन असल्याचे प्रतिपादन ‘दै. गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.

कोकणी लेखक संघ, अर्थ प्रकाशन, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकणी राष्ट्र मान्यता दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राजू नायक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रा. अंजू साखरदांडे, गौरीश वेर्णेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान सुचिता पै यांचा ‘कोकणी कार्यकर्ता पुरस्कार’ आणि जॉन आगियार यांचा ‘कोकणी भक्ती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच संदीप रेवणकर यांच्या ‘आनी कणसां हासली’ या नाट्यसंहितेचे प्रकाशन करण्यात आले.

दरम्यान, राजू नायक म्हणाले, आम्हाला भविष्यातील गोवा नेमका कसा हवा आहे, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आज गोव्यातील जमिनी, येथील व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात राहिले नाहीत. स्थानिक कोकणी भाषाही कोठे दिसत नाही. व्यवहार हिंदीत होत चालले आहेत, ही स्थिती अशीच कायम राहिल्यास पुढील दहा वर्षांत भयाण स्थिती निर्माण होईल.

गांभीर्याने विचारमंथन व्हावे!

गोव्याची कोकणी राजभाषा करण्यामागील हेतू काय होता? हेच आम्ही आज विसरत आहोत. आज ग्रामीण भागातदेखील लहानशा गाड्यावर एखाद्या व्यक्तीचा पत्ता विचारला तरी ‘मुझे मालूम नही’ असे सांगितले जाते. कोकणी राजभाषा करण्यामागील प्रेरणा कायम ज्वलंत ठेवणे गरजेचे अाहे. तसेच याबाबत गांभीर्याने विचारमंथनही व्हायला हवे, असे प्रतिपादन आमदार दिगंबर कामत यांनी केले.

आम्ही विद्यार्थी घडवतो!

गोव्यात पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या महाविद्यालयात ‘इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीचे लेखन’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून नव्या माध्यम तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थी घडवत आहोत. या विषयाचे प्रात्याक्षिक ज्ञान देण्यासाठी ‘गोमन्तक टिव्ही’चे आम्हाला सदोदित सहकार्य लाभत असल्याचे प्रा. अंजू साखरदांडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC पाकिस्तान क्रिकेट टीमवर बंदी घालणार? दोन आठवड्यात होणार निर्णय, सोशल मीडियावर रंगली चर्चा

High Court: ‘कथित धर्मांतरणा’चा गुन्हा रद्द, पास्टर डोमिनिक आणि पत्नी जोनला हायकोर्टाचा मोठा दिलासा, याचिका काढली निकाली!

रामा यांच्या हल्ल्यामागे विद्यमान मंत्र्याचा हात? काँग्रेस आमदार फेरेरांचा संशय, 'गॉडफादर'चे नाव जाहीर करण्याचे पोलिसांना आवाहन

Borim Drugs Seized: बोरी येथे गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; 1.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shah Rukh Khan: किंग खानला मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, पत्नी गौरीची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ’

SCROLL FOR NEXT