Khapreshwar Temple CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Khapreshwar Temple: पर्वरीत श्री खाप्रेश्वर देवाची पुन:प्रतिष्ठापना उत्साहात; पाहा Video

Khapreshwar Pratishthapna: पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामाचे निमित्त पुढे करून स्थलांतर केलेल्या श्री देव खाप्रेश्वराच्या मूर्तीची आज पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.

Sameer Panditrao

पणजी: पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामाचे निमित्त पुढे करून स्थलांतर केलेल्या श्री देव खाप्रेश्वराच्या मूर्तीची आज पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह अनेकांनी देवाचे दर्शन घेतले. ही मूर्ती स्थलांतरित केल्यामुळे सरकारला रोषाला सामोरे जावे लागले होते. मूर्तीची अन्य जागी प्रतिष्ठापना करण्याची तयारीही सरकारने दर्शवली होती. श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती मूळ जागेच्या परिसरातच प्रतिष्ठापित केली जावी असा भाविकांचा आग्रह होता. त्यानुसार रविवारी पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.

धार्मिक सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “पुनःप्रतिष्ठापित हे मंदिर नवसाज सौंदर्य आणि दैवी तेज घेऊन उभे राहिले आहे. खाप्रेश्वराची आध्यात्मिक ऊर्जा आता अधिक प्रभावीपणे जाणवते.” कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार केदार नाईक, प्रवीण आर्लेकर, संकल्प आमोणकर, माजी आमदार ग्लेन टिकलो आदींनी दिवसभरात देवदर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: काही राशींना मोठ्या संधी, तर काहींनी घ्यावी सावधगिरी; राशिभविष्य काय देतंय संकेत? वाचा..

Querim Ponda: सफर गोव्याची! 4 डोंगरांनी वेढलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले 'केरी-फोंडा'

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

SCROLL FOR NEXT