Kala Academy Panjim  Dainik Gomantak
Video

Kala Academy:"गोविंद गावडेंना पर्वा नाही" राजदीप नाईक यांचा थेट आरोप; मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना

Rajdeep Naik on Kala Academy: मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित अध्यक्ष दामू नाईक यांनी तरी किमान कला अकादमीकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलीये

Akshata Chhatre

पणजी: कला अकादमीमध्ये पुरुष या नाटकाचा प्रयोग सुरु असताना अचानक लाईट्स फ्लिकर व्हायला सुरुवात झाली आणि पुरुष या नाटकाचा पहिला अंक काही काळासाठी बंद करावा लागला. नाटकाचे निर्माते शरद पोंक्षे यांनी सर्वांसमोर येत माफी मागीतली आणि यानंतर आता गोवा सरकारवर सगळीकडून टीका केली जात आहे. या घटनेवर गोव्यातील प्रसिद्ध अभिनेता राजदीप नाईक याने मत व्यक्त केले आहे.

शरद पोंक्षेंनी कारण नसताना माफी मागितली असं म्हणत त्यांनी ही चूक सर्वस्वीपणे कला अकादमीची असल्याचा दावा केला. कला अकादमीचे पुनर्निर्माण झाल्यापासून अशा छोट्या-मोठ्या त्रुटींची वेळोवेळी दाखल घेतली जावी अशी मागणी स्थानिक कलाकारांकडून केली जायची मात्र यावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही असं नाईक म्हणाले आहेत.

अनेकवेळा नाटक करताना किंवा बघताना रंगमंच्याबरोबरच आणखीन त्रुटींबद्दल सांगून देखील सरकार कान असून नसल्यासारखं वागायचं. यानंतर 'कला मांड' नावाची कमिटी स्थापन करण्यात आली मात्र त्यांनी देखील काहीही सुधारणा केल्या नाहीत.

कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमीत काही गैर प्रकार झालाय असं वाटत नाही, किंबहुना त्यांना काहीही पर्वा नाही, मात्र मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित अध्यक्ष दामू नाईक यांनी तरी किमान कला अकादमीकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT