Kadamba Dainik Gomantak
Video

Kadamba: ‘कदंब’च्या कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा पावले’

Ulhas Tuenkar - कदंबाच्या ड्रायव्हर, कंडक्टरना महामंडळाकडून चतुर्थीची मोठी भेट!

गोमन्तक डिजिटल टीम

कदंब महामंडळात 2018 साली रोजंदारी तत्त्वावर भरती झालेले 15 बसचालक आणि 15 बसवाहकांना गुरुवारी कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याचे नियुक्तीपत्र महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष क्रितेश गावकर देखील उपस्थित होते. 2018 मधील तुकडीत कामाला रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न चतुर्थीपूर्वी पूर्ण झाल्याने त्यांना ‘बाप्पा पावले’ अशी चर्चा कदंब महामंडळात सुरू आहे.

नियुक्तीपत्रे मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आभार मानले. आम्ही अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट पाहात होतो आणि चतुर्थीपूर्वी आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आम्ही महामंडळाला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर रायगड येथे अपघात, चालकाचा पाय तुटला; बस आणि ट्रकची धडक

Goa Assembly Live Updates: शेतकर्‍यांनी जमिनी राखून ठेवाव्या - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

GCA: गोवा क्रिकेट संघटनेत पुन्हा 2 गट, निवडणूक होणार 16 सप्टेंबर रोजी; समितीतील मतभेद गाजण्याचे संकेत

Shravan Special Train: मडगावातून निघणार ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण यात्रा’; भारत गौरव ट्रेनने प्रवास, गोव्यातून चांगला प्रतिसाद

LPG Price Cut: सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता, रक्षाबंधनापूर्वी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

SCROLL FOR NEXT