पेडणे: राज्य सरकारकडून बेकायदा रेती उपशावर बंदी घालण्यात आलेली असतानाही, पेडणे तालुक्यातील काही भागांत हे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सोमवारी (७ एप्रिल) पहाटे अशाच एका बेकायदेशीर रेती उपशावर धाड टाकत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले आहे.
पोलिस उपनिरीक्षक योगेश शिरोडकर व कॉन्स्टेबल आदित्य शेट्ये हे सोमवारी पहाटे सुमारे ४.५०च्या सुमारास गस्त घालत असताना, तेरेखोल नदीपात्राजवळील न्हयबाग या ठिकाणी बेकायदा रेती उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने कारवाई करत उपसा सुरु असलेल्या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान, बेकायदा रेती उपशासाठी वापरण्यात येणारी एक होडी, विविध उपकरणे आणि सुमारे ५ घन मीटर रेती असा एकूण अंदाजे २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.