Gundelvada Velus primary school  Dainik Gomantak
Video

Valpoi School Roof leak:छपराची दुरुस्ती रखडली, विद्यार्थ्यांना भर पावसात शिकण्याची वेळ; गुंडेलवाडा - वेळुस सरकारी प्राथमिक शाळेची दुरावस्था; Video

Gundelvada Velus primary school: शाळा सुरू होऊनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही, यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Sameer Panditrao

वाळपई: सरकार लाखो रुपये खर्च करते. मात्र, ज्या ठिकाणी खरीच गरज असते त्याठिकाणी त्यांचे दुर्लक्ष होते.अशीच अवस्था वाळपई नगरपालिका प्रभाग २ मध्ये असलेल्या गुंडेलवाडा-वेळूस-वाळपई येथील सरकारी प्राथमिक शाळेची झालेली आहे.

या शाळेच्या छपराची दुरुस्ती महिनाभरापासून रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना भर पावसात शिकण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होऊनही अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही, यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संबंधी माहिती अशी की, ही शाळा सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. त्यानतंर  या शाळेची एकदाच  काही प्रमाणात दुरुस्ती केली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून  या इमारतीची दुरुस्ती करा किंवा नवीन इमारत बांधा अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या छपरातून गळती सुरूच असते. त्यामुळे मुलांना वर्गात पाण्यातच बसावे लागते. शाळा जुनी झाल्यामुळे छप्पर खराब झाले आहे. काही लाकडी खांब मोडकळीस आले आहेत. भिंतीला तडा गेलेला आहे. शौचालयाचीही  दयनीय अवस्था आहे. त्यामुळे येथे नवीन सुसज्ज अशी इमारत व्हावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT