Railway Ministry deleted post Dainik Gomantak
Video

Goa Railway Double Tracking: डबल ट्रॅकिंग प्रकल्पाविषयी X वर केलेली पोस्ट मंत्रालयाने का हटवली? Watch Video

Railway Ministry deleted post: रेल्वे मंत्रालयाने ‘एक्स’वर डबल ट्रॅकिंगविषयी उत्साहाने पोस्ट केली. कोळसा जलद ने-आण करण्यासोबतच गोवा व हम्पीतील पर्यटनालाही चालना मिळणार, अशी गोड गोड वचने त्यात होती.

Sameer Panditrao

पणजी: गेले दोन दिवस राज्यात कोळशाच्या भुकटीचा धुरळा उडवणारी पोस्ट ‘एक्स’ या समाज माध्यमावरून रेल्वे मंत्रालयाने हटवली आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ ऑगस्ट रोजी ‘एक्स’वर डबल ट्रॅकिंग प्रकल्पाविषयी उत्साहाने पोस्ट केली. कोळसा, लोखंड खनिज आणि पोलाद जलद ने-आण करण्यासोबतच गोवा व हम्पीतील पर्यटनालाही चालना मिळणार, अशी गोड गोड वचने त्यात होती. पण काय झाले? ती पोस्ट अचानक गायब झाली! गोव्यात गेल्या दोन दिवसांत हा विषय अक्षरशः ‘हायलाईट’ ठरला आहे. विरोधकांनी तर थेट विचारले - “हे पर्यटनासाठी आहे की कोळसा वाहतुकीसाठी?” कारण लोकांना पर्यटनाचे हवेहवेसे फोटो दाखवायचे आणि मागे मागे गडगडत येणाऱ्या कोळशाच्या गाड्या लपवायच्या, अशीच काहीशी योजना वाटते, अशी टीका गेले दोन दिवस ऐकू येत होती. रेल्वे मंत्रालयाची पोस्ट हटवल्यानंतर आता जनतेत प्रश्न - चूक झाली म्हणून पोस्ट डिलीट झाली की खरी माहिती बाहेर पडली म्हणून? गोव्यातील मच्छीमार, पर्यावरण कार्यकर्ते व सामान्य नागरिक आधीपासूनच डबल ट्रॅकिंगच्या कोळसा जोडणीवर बोट ठेवत आहेत. पर्यटनाचा ‘साखरपेरणीचा’ बहाणा आणि मागे ‘कोळशाचा धूर’ - अशी या प्रकल्पाची आजची स्थिती आहे, असेच म्हणावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

SCROLL FOR NEXT