Dainik Gomantak
Video

Goa News: थिये धनवा भिरांकूळ अपघातांत एकल्याक मरण

72 Year Old Man Killed Goa: या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या पालकांनाही बोलावले आहे

Akshata Chhatre

थिवी येथे एका भीषण अपघातात ७२ वर्षीय रामचंद्र शिरोडकर यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ आणि १७ वर्षांचे दोन अल्पवयीन तरुण भरधाव वेगात ओला स्कूटर चालवत होते. सायंकाळी फिरायला गेलेले शिरोडकर घरी परत येत असताना, या तरुणांनी त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, आणि उपचारादरम्यान त्यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) मृत्यू झाला.

या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या पालकांनाही बोलावले आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम राणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे, अल्पवयीन मुलांना दुचाकी कशी उपलब्ध झाली, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी आता वाहन चालवणाऱ्या मुलांसह वाहनाच्या मालकाचीही जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech: 12 लाखांपर्यंत आयकर माफ, जीएसटीत सूट; मोदींची घोषणा मध्यमवर्गासाठी ठरली 'डबल बोनस'

Navratri 2025 Wishes in Marathi: सण देवीचा, उत्सव भक्तीचा... नवरात्रीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा 'या' खास शुभेच्छा

Navratri 2025: नवरात्रीचा उपवास करत असाल, तर 'या' चुका चुकूनही करू नका; वाचा व्रताचे कठोर नियम

Viral Video: अजब-गजब ड्रामा! होर्डिंगवर झोपलेल्या पठ्ठ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ; नेटकरी म्हणाले...

Goa Crime: मद्यप्राशन करुन चाकूने केले वार, बायणा येथे 64 वर्षीय महिलेची हत्या; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT