Betoda IIT Oppose Dainik Gomantak
Video

Betoda IIT Oppose: कोडार येथे 'IIT'ला आता कसमशेळवासीयांचाही तीव्र विरोध, गावातील नैसर्गिक जैवसंपदा नष्‍ट न करण्‍याची मागणी

Goa IIT Kodar protest: कोडार येथे नियोजित आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध वाढत चालला आहे. कसमशेळ भागातील ग्रामस्थांनीही एकत्रित येऊन आज आपला विरोध दर्शविला.

Sameer Amunekar

फोंडा : कोडार येथे नियोजित आयआयटी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध वाढत चालला आहे. कसमशेळ भागातील ग्रामस्थांनीही एकत्रित येऊन आज आपला विरोध दर्शविला. सरकारने नैसर्गिक जैवसंपदा नष्ट करू नये, आयआयटी आणण्याची सरकारने सक्ती केल्यास संघटित लढा उभारू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

कोडार-बेतोडा गावात नैसर्गिक समृद्धी असून त्याचा ऱ्हास होऊ नये अशी मनीषा व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. खुद्द कसमशेळ गावात ९५ टक्के लोक कृषीकार्डधारक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जैवसंपदा असलेल्या या गावात रानटी जनावरेही वावरत असतात. मात्र शेतकऱ्यांनी आपली बागायती आणि शेती सोडलेली नाही. शेती आणि बागायतीमुळेच येथील रोजी-रोटी टिकून राहिली असून शेतकऱ्यांच्या कष्टामुळे या ठिकाणी फुलणारे मळे हे आर्थिक साधन बनले आहे. आयआयटी आल्यास ही जैवसंपदा नष्ट होण्याचा धोका असून सरकारने या भागात आयआयटी आणण्याचा विचार सोडून द्यावा आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

सत्तरीत विचित्र घटना! भर बाजारात सापडली हाडं,परिसरात खळबळ; नेमकं काय घडलं? वाचा

Viral Video: चोराला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, बहाद्दर महिलेचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी अवाक; म्हणाले, 'ही तर ब्रूस लीची आजी...'

Goa Politics: काँग्रेसहून आलेले आठ आमदार 'डेंजर झोन'मध्ये; दामूंच्या 27 जागांचा संकल्प भाजपसाठी थट्टेचा विषय ठरणार?

BITS Pilani विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; उलटीत सापडले तीन प्रकारचे ड्रग्ज, घटनेचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT