goa cable operators  Dainik Gomantak
Video

Internet Service: इंटरनेट केबल्स सेवा पुरवठादारांना दणका; कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार !!

HC Decision on Cable Operators: याचिकादाराने केलेल्या विनंतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला

Akshata Chhatre

पणजी: राज्यात इंटरनेट सेवा पुरवठा करण्यासाठी वीजखांबांचा गैरवापर केल्याप्रकरणी वीज खात्याकडून केलेल्या कारवाईविरोधात अखिल गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेने याचिका दाखल केली. खात्याच्या या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास याचिकादाराने केलेल्या विनंतीला सोमवारी (दि.२४) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे वीज खात्याचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकादाराच्या वकिलांनी वेळ मागितल्याने ही सुनावणी आता पुढील मार्च महिन्यात १८ रोजी ठेवण्यात आली आहे.

याचिकादारचा राज्यभर इंटरनेट सेवा पुरवठा असून त्याने केबल्स टाकण्यासाठी खांबांचा वापर केला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये माहिती तंत्रज्ञान खात्याने संघटनेशी बैठक घेतली होती. नव्या टेलिकॉम धोरणानुसार 'राईट ऑफ वे' अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्व तालुक्यांत पुरवठा करणाऱ्या इंटरनेट सेवा पुरवठादारांतर्फे अर्ज सादर करण्यात आले होते. या अर्जाचा पाठपुरावा करण्यात आला तरी त्यावर निर्णय घेण्यात आला नाही.

१ जानेवारी २०२५ रोजी दूरसंचार खाल्याने राष्ट्रीय 'राईट ऑफ वे' घोरण जाहीर केले व त्याची अंमलबजावणी गोव्यासह इतर राज्यांमध्ये लागू करण्याचे निर्देश दिले, याचिकादाराने या धोरणानुसार संबंधित माहिती तंत्रज्ञान खात्याकडे अर्ज केला, धोरणानुसार जी काही प्रक्रिया करायची होती ती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT