illegal spa Goa Dainik Gomantak
Video

कोलव्यात 2 मसाज पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Goa massage parlour raid: मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या कोलव्यातील दोन मसाज पार्लरवर छापे घालून तब्बल ९ युक्तीची सुटका करण्यात आली

Akshata Chhatre

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या कोलव्यातील दोन मसाज पार्लरवर छापे घालून तब्बल ९ युक्तीची सुटका करण्यात आली. या प्रकरणात तीन महिलांना अटक केली. ज्या पार्लरवर छापे घालण्यात आली त्यापैकी एका पार्लरचे नाव 'हॅपिनेस व्हील ग्रो युनिसेक्स सलून' असे असून या पार्लरवर मानव तस्करी विरोधी पथकाने धाड पातली. या ठिकाणाहून पाच युवतीची सुटका करण्यात आली. हा पार्लर चालविणाऱ्या राधिका शर्मा या महिलेला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात मडगावच्या मानव तस्करी विरोधी विभागाच्या पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक या तपास करीत आहेत. दुसऱ्या पार्लरचे नाव 'रॉयल स्पा' असे असून ही जागा एका स्थानिकाकडून चालविण्यास घेतली होती अशी माहिती पुढे आली आहे. या पार्लरमधून चार युवतींची सुटका करण्यात आलो असून कोलवा पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली. महिला तस्करी विरोधात काम करणाऱ्या अर्ज या संघटनेच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Election 2027: राजस्थानमधील विजयाने काँग्रेसमध्ये उत्साह, पण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत गटबाजीला विराम मिळणार का?

भाजप आमदाराच्या हत्येचा कट? शरीरात कीटकनाशकाचे अंश आढळल्यानं खळबळ; प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

Curti Khandepar Gram Sabha: खुल्या जागा बळकावणाऱ्या बिल्डरांचा करेक्ट कार्यक्रम होणार? कुर्टी-खांडेपार ग्रामसभेत कारवाईचा इशारा; एकमताने ठराव संमत

Shubman Gill Dance: DRS चा निर्णय ठरला अचूक, शुभमन गिलचा आनंद गगनात मावेना! मैदानातच करू लागला डान्स Watch Video

Goa Economic Growth: "गोव्याला सिंगापूर बनवायचे नाही, तर गोवाच ठेवून चमकवायचे आहे"; ‘सागर मंथन 5.0’मध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यं

SCROLL FOR NEXT