Borim Accident Dainik Gomantak
Video

Borim Accident: बोरीत काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक, 6 जण जखमी; 12 वर्षीय मुलीचा समावेश

Borim Car And Truck Accident: बोरी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

बोरी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. काँक्रेटवाहू ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात १२ वर्षीय मुलीसह तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी गोमेकॉ (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गोवा) येथे हलविण्यात आले आहे.

सकाळच्या सुमारास बोरी येथे कार आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. ट्रकची धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT