Garbage Issue Dainik Gomantak
Video

Garbage Issue: गोव्याचा वेस्टर्न बायपास बनतोय 'कचरा डेपो'! पर्यटकांच्या वर्दळीच्या मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य

Western Bypass: गोव्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला वेस्टर्न बायपास सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

Manish Jadhav

गोव्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात आलेला वेस्टर्न बायपास सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. हा महामार्ग आता कचऱ्याचा नवा डम्पिंग यार्ड बनत चालला असून रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मडगाव आणि नावेली परिसरातील बायपासच्या कडेला रात्रीच्या वेळी गुपचूप कचरा टाकला जात आहे. यामध्ये घरातील ओला कचरा, प्लास्टिक आणि हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ यांचा समावेश असतो. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. हा मार्ग दक्षिण गोव्यातील अनेक पर्यटन स्थळांना जोडणारा असल्याने, पर्यटकांच्या मनात गोव्याच्या स्वच्छतेबद्दल चुकीचा संदेश जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT