FDA RAID Dainik Gomantak
Video

एफडीएची उत्तर गोव्यात कमी दर्जाचे काजू व बेकायदेशीर सिगारेटवर कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, गोवा यांच्याकडून उत्तर गोव्यातील कलंगुट या भागात अचानक धाड टाकत काजू विक्रेत्यांच्या दुकानांची पाहणी करण्यात आली. अधिकारी रिचर्ड नर्होना यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या भागातील पाच-सहा दुकानांची पाहणी करत निकृष्ट दर्जाच्या काजूच्या मालावर कारवाई केली. रिचर्ड नर्होना सांगतात की गेल्यावर्षी देखील अशाच मोहिमेअंतर्गत त्यांनी दहा ते पंधरा तक्रारी नोंदवल्या होत्या. या मोहिमेनंतर बऱ्यापैकी सकारात्मक बदल दिसून आले आणि यावर्षी देखील राज्यात पर्यटनाचा हंगाम सुरु होण्याआधी ही मोहीम पुन्हा राबवायला सुरुवात केली आहे. गोव्यात विकल्या जाणाऱ्या काजूंवर आता GI टॅग लावला जाईल अशी माहिती देखील त्यांनी या दरम्यान दिली. दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी ही मोहीम राबवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates Today: कॅश फॉर प्लॉटमध्ये अंध युवतीची 8 लाख रुपयांची फसवणूक

IFFI Goa: सिनेमा संस्कृती रुजवण्याच्या संधीची गाडी गोव्याकडून सुटली; असं काय घडलं? वाचा सविस्तर

Goa Tourism: 1990 च्या दशकातील गोव्याची पर्यटनातील मक्तेदारी कशी संपतेय; चेतन भगतने सांगितले नेमकं काय गंडतंय

IFFI Opening Ceremony: लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन!! 55व्या इफ्फीसाठी गोवा सज्ज

Goa Coconut Market: नारळ स्वस्त होईना! दर गगनाला भिडले; वाढत्या महागाईने गोमंतकीय हैराण

SCROLL FOR NEXT