Dharbandora Car Accident Dainik Gomantak
Video

Dharbandora Car Accident: धारबांदोडयात थरार! मृत म्हशीला चुकवण्याच्या नादात कार थेट दरीत

Car Accident: धारबांदोडा येथे सकाळच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. मृत म्हशीला चुकवण्याच्या प्रयत्नात एका कारचा ताबा सुटून ती थेट दरीत कोसळली.

Sameer Amunekar

धारबांदोडा: धारबांदोडा येथे रविवारी (१३ जूलै) सकाळच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. मृत म्हशीला चुकवण्याच्या प्रयत्नात एका कारचा ताबा सुटून ती थेट दरीत कोसळली. या अपघातात कारचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही कर्नाटक राज्यातून गोव्यात आली होती. सकाळच्या वेळेस धारबांदोडा परिसरात दोन म्हशींना एका वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही म्हशी रस्त्याच्या मधोमध पडून राहिल्या होत्या. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटकात नोंदणीकृत कारने मृत म्हशीला चुकवण्याचा प्रयत्न केला आणि चालकाचा ताबा सुटल्याने ती थेट दरीत जाऊन कोसळली.

घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत कारमधील जखमी चालकाला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या समस्येकडे लक्ष वेधले जात आहे. रस्त्यांवर फिरणारी जनावरे व त्यांना वाहनांची होणारी धडक ही अनेक अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा...', मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांची राणेंकडून दखल; गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याचं आवाहन

Asthma: पडदे, कार्पेट... घरातील सजावटीच्या वस्तूच वाढवतायेत अस्थमाचा धोका? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या

Governor Of Goa: पशुपति अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त!

Supreme Court: 'द्वेष पसरवणाऱ्या कंटेटवर तात्काळ बंदी घाला, पण...' सर्वोच्च न्यायालयाचे हेट स्पीचबाबत केंद्र अन् राज्यांना निर्देश

IND vs ENG: शुभमन गिलने मोडला राहुल द्रविडचा 23 वर्ष जुना रेकॉर्ड, कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ठरला भारतीय फलंदाज

SCROLL FOR NEXT