Bicholim Health Centre Dainik Gomantak
Video

Bicholim: डिचोली आरोग्य केंद्रातील 'तो' फलक अखेर हटवला, बनला होता वादाचा विषय

Bicholim Health Centre: डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात लावलेला ‘तो’ वादग्रस्त फलक अखेर काढण्याची नामुश्की आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांवर आली.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात लावलेला ‘तो’ वादग्रस्त फलक अखेर काढण्याची नामुश्की आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांवर आली. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात व्हिडीओग्राफी करण्यास बंदी घालणारा आदेश जारी करताना तशा आशयाचा फलकही लावला आहे. मात्र, या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात ‘पत्रकारांना प्रवेश बंदी’ अशा आशयाचा फलक लावला होता. या फलकावरून पत्रकारांमध्ये मोठी खळबळ उडून हा वादाचा विषय बनला होता.

गोवा श्रमिक पत्रकार संघटनेसह (गुज) स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणाचा निषेध केला होता. जागृत नागरिकांनीही या फलकावरून आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने डिचोलीच्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ‘तो’ वादग्रस्त फलक गायब केला. त्यामुळे या फलकावरून निर्माण झालेला वाद तूर्त निवळल्यातच जमा आहे. हा फलक आरोग्य खात्याच्या आदेशानुसार लावला होता, की आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचा हा आततायीपणा? ते समजू शकले नाही. मात्र, या फलकावरून मात्र वादाची ठिणगी पडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT