CM Sawant on Rama Kankonkar's Statement Dainik Gomantak
Video

CM Sawant on Rama Kankonkar's Statement: मुदाम राजकीय रंग दाखोवपाचो यत्न; मुख्यमंत्र्याचें विधान

Rama Kankonkar: काणकोणकर यांनी दोन ज्येष्ठ मंत्र्यांची नावे घेतल्यावर म्हापसा येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परतताना मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

Sameer Panditrao

म्हापसा: गोमेकॉतून उपचारानंतर आज घरी पाठवण्यात आलेले रामा काणकोणकर यांनी केलेले आरोप, हे सरकारची बदनामी करण्यासाठी तसेच मुद्दाम राजकीय रंग देण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, असा पलटवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

काणकोणकर यांनी दोन ज्येष्ठ मंत्र्यांची नावे घेतल्यावर म्हापसा येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परतताना मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की “सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहात आहे. रामांकडून मिळालेल्या माहितीवरून अनेकजणांना अटकही करण्यात आली आहे. त्यांचे आधीचे निवेदन पोलिसांनी नोंदवले आहे. इतक्या दिवसांनी त्यांनी पुन्हा नवीन विधान करून प्रकरण संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला आहे.”

मुख्यमंत्री म्हणाले, “लोक मला चांगले ओळखतात. गेली २५ वर्षे मी राजकारणात आहे. अशा किरकोळ आणि नीच गोष्टी करण्यासाठी मी येथे नाही.” त्यांनी स्पष्ट केले, की या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींना शिक्षा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पार्टनर'च्या आजारपणामुळे हवा व्हिसा, रशियन महिलेच्या अर्जावर निर्णय घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात बांबोळी, नावशीही; किनारपट्टी भागातील गावांचा वाढतोय पाठिंबा, चिंबलमध्ये एकजूट

Goa Police Recruitment: उपनिरीक्षक पदांसाठीची अंतिम सीबीटी 25 रोजी, परीक्षेसाठी दोन्ही जिल्‍ह्यांतील केंद्रेही निश्‍चित

IND VS NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का; ऋषभ पंत अचानक बाहेर, ईशान किशनला मिळणार संधी?

'कुशावती'साठी 500 कोटी द्या! CM प्रमोद सावंतांचे केंद्राला साकडे, गोव्याच्या 3960 कोटींच्या विविध मागण्या

SCROLL FOR NEXT