Water Resources Department Dnyaneshwar Salelkar  Dainik Gomantak
Video

Water Resources Department: जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंतेपदी ज्ञानेश्वर सालेलकर

Dnyaneshwar Salelkar: ३१ मे २०२२ पासून सलग चार वर्षे सेवा मुदतवाढ मिळवणारे प्रमोद बदामी यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: जलसंपदा खात्याच्या मुख्य अभियंतापदाचा ताबा अखेर अतिरिक्त मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांच्याकडे देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पासून सलग चार वर्षे सेवा मुदतवाढ मिळवणारे प्रमोद बदामी यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. गोवा अनुसूचित जाती, जमाती आयोगाने बदामी यांची सेवा मुदतवाढ समाप्त करण्याचा निवाडा दिला आणि सरकारने तातडीने बदामी यांना पदमुक्त केले. जलसंपदा खात्यात मुख्य अभियंता पदासाठी लायक उमेदवार नाहीत, असे कारण देत सरकार बदामी यांना सेवा मुदतवाढ देत होते. बदामी हे कर्नाटकचे असल्याने म्हादई जलवाटप तंट्यात ते गोव्याची बाजू भक्कमपणे मांडणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार नाहीत, असा आरोप करून सामाजिक कार्यकर्त्यांनी बदामी यांना सेवामुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. बदामी यांना सेवा मुदतवाढ दिल्याने आपल्याला मुख्य अभियंता म्हणून कामच करता येणार नाही, असा दावा करून सालेलकर यांच्याकडून आयोगाकडे दाद मागण्यात आली होती. त्यानंतर आयोगाने बदामी यांची सेवा मुदतवाढ समाप्त करण्याचा आदेश दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT