Bhoma Bypass Dainik Gomantak
Video

Bhoma Road: भोमातील स्थानिकांनी घेतली उत्पल पर्रीकरांची भेट

Bhoma Villagers: पणजीतील महालक्ष्मी ट्रस्टच्या कार्यालयात उत्पल यांची भोमच्या नागरिकांनी भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. भोम येथून जाणाऱ्या महामार्गाला येथील नागरिकांचा विरोध कायम आहे.

Sameer Panditrao

पणजी: भोमच्या नागरिकांनी मंगळवारी उत्पल पर्रीकर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. भोम येथून जाणाऱ्या महामार्गाला नागरिकांचा विरोध आहे, त्याविषयी नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. विविध नेत्यांची भेट घेतली, परंतु त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

पणजीतील महालक्ष्मी ट्रस्टच्या कार्यालयात उत्पल यांची भोमच्या नागरिकांनी भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. भोम येथून जाणाऱ्या महामार्गाला येथील नागरिकांचा विरोध कायम आहे. अनेक नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्याशिवाय विरोधकांचा या नागरिकांच्या आंदोलनाला पाठिबाही राहिला आहे. राज्य सरकार भोममधील मंदिराला धक्काही लागणार नाही, असे सांगितले जात असले तरी तेथील नागरिक त्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्याशिवाय बगल रस्त्याचा पर्याय उपलब्ध असल्याने तेथून रस्ता नेला जात नाही, त्याच्या आड राजकारण येत असल्याचे नागरिकांच्यावतीने संजय नाईक यांनी सांगितले. उत्पल यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या, परंतु त्यांनी राज्य सरकारवरच हा निर्णय अवलंबून असल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa To London Flight: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गोवा ते लंडन विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरु होणार; पर्यटनमंत्री खवंटेंची माहिती

Goa Real Estate: गुरुग्राम नको, आता 'गोवा'च! लक्झरी व्हिलांचा आसगाव बनतंय हॉटस्पॉट; गुंतवणूकदारांना मिळतोय बंपर फायदा

Goa Assembly Live: 'जुन्या गोव्यासाठी मास्टर प्लॅनची मागणी' युरी आलेमाओ

Karnataka: कशासाठी? कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी! HIV पॉझिटीव्ह भावाचा बहीण आणि दाजीने केला खून

Damodar Saptah Fair: रंगांचा कल्लोळ! चालीरीतींची, संस्कृतीच्या उत्सवाची झळाळती झलक; वास्कोतील फेरी

SCROLL FOR NEXT