illegal structures Goa Dainik Gomantak
Video

Goa Encroachment: अतिक्रमणं हटवण्याची फक्त 'तोंडी' ग्वाही; रुमडामळ पंचायतीवर गंभीर आरोप

Rumdamal Panchayat Allegations: रुमडामळ, दवर्ली पंचायत बेकायदेशीर अतिक्रमणांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पंच विनायक वळवईकर यांनी केला

Akshata Chhatre

मडगाव: सध्या गोव्यात ठिकठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमणांना हटवण्याचं काम सुरु आहे. दक्षिण गोव्यातील रुमडामळ, दवर्ली पंचायत बेकायदेशीर अतिक्रमणांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पंच विनायक वळवईकर यांनी केला होता मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जाईल अशी माहिती सरपंच सबिना यांचे पती सासिउल्ला फणिबंद यांनी दिली आहे.

२० डिसेंबर रोजी रुमडामळ पंचायतीतील बेकायदेशीर अतिक्रमणंना नोटीस पाठवत उच्च न्यायालयाने परवाने सादर करण्याचा आणि असं न केल्यास येत्या सात दिवसांमध्ये बांधकामं पाडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर आता बराच काळ उलटून गेला आहे तरीही म्हणावी ती करावी झालेली नसल्याचा आरोप पंच विनायक वळवईकर यांनी केलाय.

काही कारणांमुळे अजून सगळी बांधकामं हटवली गेलेली नाही, मात्र त्यांना नोटीस पाठवण्यात आलीये. यांपैकी काही बांधकामं हटवली गेली असून बाकी बांधकामं सुद्धा हटवली जातील अशी माहिती पंच सासिउल्ला फणिबंद यांनी दिली. मात्र पंचायत फक्त दाखवण्यापुरती कारवाई करत आहे, मुळात असं काहीही होणार नाही असा थेट आरोप पंच विनायक वळवईकर यांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT