Merces Scrapyard Gas Leakage canava
Video

Merces Gas Leakage: मेरशीतील स्क्रॅपयार्डांवर कारवाई करुन ते बंद करण्याची मागणी

Merces Gas Leak Case: क्लोरीन गॅस गळती झाल्याने परिसरातील लोकांना बराच त्रास झाला होता. बेकायदेशीररीत्या भंगार अड्डा सुरू असल्याने तो जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Merces Panchayat:

बामाणभाट, मेरशी येथे भंगार अड्ड्यात झालेल्या क्लोरिन गॅस गळती प्रकरणात मेरशीच्या ग्रामस्थांनी जुने गोवा पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून क्लोरीन सिलिंडर कुठून आला याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मेरशी ग्रामस्थ भंगार अड्डा जमीनदोस्त करण्यासंदर्भात आक्रमक झालेले आहेत. बेकायदेशीररीत्या भंगार अड्डा सुरू असल्याने हा जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे. तत्पूर्वी मेरशी गाव विकास समितीने मेरशी पंचायतीला पत्र लिहून मेरशी परिसरातील सर्व भंगारअड्डे बंद करण्याची मागणी केली होती. या घटनेतून भंगारअड्डे धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आम्ही वारंवार ग्रामसभा आणि पत्र व्यवहारातून भंगारअड्डे धोकादायक असल्याचा विषय मांडून याचे गांभीर्य पंचायतीच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! टीममध्ये एन्ट्रीसाठी चक्क बनावट कागदपत्रे; स्टार खेळाडू अडचणीत, BCCIकडे तक्रार दाखल

Goa Politics: सर्व विरोधकांची एकजूट गरजेची! युरींचा महायुतीचा पुनरुच्चार; आप,आरजीला सोबत घेण्याची तयारी

Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

Goa Crime: कांदोळीतील व्हिलामध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास; कळंगुट पोलिसांत तक्रार

Mungul Gangwar: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईकला सशर्त जामीन मंजूर, इतरांच्या जामिनावर सोमवारी निवाडा

SCROLL FOR NEXT