AAP Amit Palekar On Liquor Scam Dainik Gomantak
Video

Liquor Scam: बेकायदा दारू कारखान्यातच का पकडली जात नाही? पालेकरांचा प्रश्न; अबकारी खात्याच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका

Amit Palekar: आम आदमी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अबकारी खात्याच्या भोंगळ कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली.

Sameer Panditrao

पणजी,: गोव्यातून दर आठवड्याला लाखोंची बेकायदा दारू बाहेर जात असल्याचे पकडल्यानंतर कळते. पकडलेल्या मद्यावरून तिची कुठे निर्मिती होते, हे समजते. त्यामुळे त्या मद्य उत्पादन कारखान्यातच अशी बेकायदा दारू वाहतूक अबकारी खात्याकडून पकडली का जात नाही, असा सवाल ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केला.

आम आदमी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अबकारी खात्याच्या भोंगळ कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, हरयाणात सर्वात स्वस्त मद्य मिळते. तेथून गोव्यात आलेली अडीच कोटींचे मद्य पकडल्यानंतर ते कुठे जाणार होते, ही सर्व चालकाकडे माहिती असणार आहे, तरीही त्याविषयी कोणास अटक होत नाही. त्याशिवाय राज्याच्या सीमेवरून बेकायदेशीरपणे दारू वाहतूक करण्यासाठी प्रत्येक पिकअप ट्रकसाठी २५,००० ते २.५ लाख रुपयांपर्यंत लाच दिली जात आहे. साधारण दिवसाला चार ते पाच अवैध ट्रक दारू राज्याबाहेर जात असल्यास रोज दोन कोटींचा अबकारी महसूल बुडत आहे,असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT