Vaishali Takkar Suicide  Dainik Gomantak
मनोरंजन

TV Actress Suicide: प्रसिद्ध मालिकेतील तरूण अभिनेत्रीची प्रेम प्रकरणातून आत्महत्या

गेल्या वर्षीच केनियातील डॉक्टरशी झाला होता साखरपुडा; इंदुरमधील घरात घेतला गळफास

गोमन्तक डिजिटल टीम

TV Actress Suicide: स्टार प्लस या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये संजना ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री वैशाली टक्कर (वय 30) हीने आत्महत्या केली. इंदुरमधील राहत्या घरात तिने गळफास घेतला.

वैशालीच्या मृतदेहाजवळच सुसाईड नोटदेखील सापडली आहे. प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला आहे. तथापि, सुसाईट नोटमध्ये काय लिहिले आहे, हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. वैशाली ही उज्जैनच्या महिदपूर येथील रहिवासी आहे. ती गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवला आहे.

वैशालीने गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी केनियातील डेंटिस्ट डॉ. अभिनंन याच्याशी साखरपुडा केला होता. कुटूंबातील ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. दोघेही जून २०२१ मध्ये लग्न करणार होते. पण महिनभरानंतर त्यांनी कोरोनामुळे लग्न पुढे ढकलले होते. जेव्हा स्थिती चांगली होईल, तेव्हा लग्न करू, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

स्टार प्लसवरील मालिकेने मिळाली लोकप्रियता

स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून वैशालीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती. ती या मालिकेत संजना ही व्यक्तिरेखा साकारत होती. 2015 ते 2016 या काळात ती या मालिकेत कार्यरत होती. त्यानंतर तिने ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर्स, लाल इश्क आणि विष या अमृत, मनमोहीनी 2​​​​​ या टीव्ही मालिका आणि शोज केले होते. ससुराल सिमर का 2 मधील निगेटिव्ह भूमिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला होता.

यापुर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री जिया खान, आसिफ बसरा, कुशल पंजाबी, प्रत्यूषा बॅनर्जी यांनी आत्महत्या केली होती. याशिवाय सिद्धार्थ शुक्ला च्या मृत्यूनेही अनेकांना धक्का बसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT